Viral Video: बॉयफ्रेंडशी बोलता बोलता रेल्वे ट्रॅकवर पडली इतक्यात...; पुढे जे घडलं पाहून हैराण व्हाल
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट असे अनेकत व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे.
यामध्ये एका मुलीचा हैराण करणार प्रसंग दिसत आहे. ही घटना एका रेल्वे स्टेशनवर घडली असून, मुलगी फोनवर बोलत असताना स्वतःचीच जीव धोक्यात घालते. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, लोकांना या घटनेबाबत खूपच आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. जीव धोक्यात आल्यानंतर देखील मुलगी फोनवर बोलायचे सोडत नाही हे पाहून तर अनेकांना धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी राहून फोनवर तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत आहे. ती कॉलमध्ये इतकी गुंग झाली की समोरील परिस्थितीकडे लक्ष देण्यास विसरली. ती बोलत बोलता रेल्वे ट्रॅक पार करत असताना अचानक ट्रॅकवर पडते. याच क्षणी तीव्र वेगाने येणारी मालगाडी तिच्या दिशेने येताना व्हिडिओत दिसत आहे. या क्षणाने पाहणाऱ्या लोकांच्या काळाजात नक्कीच धस्स झाले असेल. घाबरलेल्या अवस्थेत ती पटकन रेल्वे पटर्यांवर झोपून राहते. यामुळे तिचा जीव वाचतो. हे दृश्य खूपच भयावह होते. आश्चर्याची बाब म्हणजे, एवढे होऊन पण ती पुन्हा एकदा फोनवर कोणतीही भिती न बाळगता बोलत राहते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ranchi_explores या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या घटनेने आपल्या भोवतालच्या परिस्थितीकडे सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे मोठा अपघात होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. अशा घटना आपल्याला जीवनाबद्दल जबाबदारीने वागण्याची जाणीव करून देतात. व्हिडिओ पाहणाऱ्यांनी मुलीवर तीव्र टिका केली आहे. परंतु, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.