फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायाला मिळतात. सध्या एक विचित्र व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या गोष्टीचा आपण कधीही विचार देखील केला नसेल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे.
संपूर्ण इंटरनेटवर या व्हिडिओने धुमाकूळ घातली आहे. जपानमध्ये एका व्यक्तीने लाखो रुपये खर्च करून स्वतःला श्वान बनवण्याचे धाडस केले आहे. या व्यक्तीचे नाव टोको आहे, आणि त्याने श्वान बनण्यासाठी एक खास ड्रेस तयार करायला जपानी कंपनी झेपेटने 40 दिवस घेतले. या ड्रेसमुळे तो माणूस श्वानासारखा दिसायला लागला. टोकोने श्वानासारखा चालणे, खाणे-पिणे आणि एका पिंजऱ्यात राहणे हे सर्व करण्याचे ठरवले.
व्हिडिओत नेमकं काय?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, श्वानाचे रुप घेतल्यानंतर टोको पहिल्यांदाच घराबाहेर पडला आहे. तो त्याच्या या नवीन अवतारामुळे खऱ्या डॉग्सला भेटला. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. काहीजण त्याच्यासोबत खेळत आहेत. तर काहीजण त्याला पाहून घाबरलेले व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. अनेक लोक देखील त्याला पाहून आश्चर्यात पडलेले आहेत. एक माणूस त्याची मुलाखत घेत आहे. त्याने असा अवतार केल्यानंतर तो थोडा मोठा आणि विचित्र दिसत आहे. अनेकजणांनी त्याला बघण्यास गर्दी केलेली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ युट्यूबवरील “I want to be an animal” या चॅनेलवर टोकोने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या या विचित्र निर्णयामुळे लोकांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. तो त्याच्या ड्रेसमुळे अगदी खऱ्या श्वानांसारखा दिसत आहे. त्याच्या गळ्यात बेल्ट असून, तो फिरताना, बसताना आणि वागताना हसत-खिदळत श्वानांची नक्कल करत आहे. हे सगळे पाहून अनेकजण चकित झाले आहेत. तो ज्याप्रमाणे वागत आहे अस वाटत आहे की, तो खरोखरच एक डॉग आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे याची चर्चा सुरु आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.