थरारक! तरुण भरधाव वेगात बाईक पळवत स्टंट करायला गेला अन्... ; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी जुगाड, तर कधी स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे तरुणांचे स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणी कधी कोणता धोकादायक स्टंट करेल हे सांगणे कठीण आहे. अनेकदा या स्टंटबाजीमुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण लोक स्वत:च्या जीवाचा देखील विचार करत नाहीत.
या स्टंट व्हिडिओमुळे नवीन पिढीला चुकीचा संदेश मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणाने भरधाव वेगात बाईक पशळवून त्यावर स्टंट केला आहे. मात्र, त्याचा हा स्टंट फसला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आणि कधीचा आहे हे कळून शकलेले नाही. सध्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडिओतून लक्षात घेणे महत्वाचे आहे की, असे स्टंटमुळे जीव गमवावा लागू शकतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन अनेक गाड्या जाताना दिसत आहे. अचानक एक तरुण भरधाव वेगात बाईक पळवत येतो. त्याच वेळी तो अचानक बाईचा हॅंडल सोडून बाईक चालवण्याचा स्टंट करतो. थोडे पुढे जाताचा त्याचा तोल जातो आणि जोरात जाउन रस्त्याच्या बाजूल असलेल्या कुंपनावर धडकतो आणि तसाच फरपटत जातो. या घटनेचा व्हिडिओ त्याच्या मित्रानेच रिलसाठी रेकॉर्डकेला असावा असे व्हिडिओवरुन लक्षात येते. तरुणाने हेल्मेट देखील घातलेले नसते. त्यानंतर तरुणाला कितपत दुखापत झाली, तो कसा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @its_saddam3 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांनी यावर जोरदार टीका केली आहे. यावरुन एक प्रश्न मनात येतो की, असे स्टंट करुन सोशल मीडियावर फेमस होणे महत्वाचे की आपला जीव. एका युजरने म्हटले आहे की, प्रोफेशनल स्टंट करणाऱ्यांना बघून हे असे करायला जातात आणि भलतंच होऊन बसते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.