फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी आश्चर्यकारक तर कधी मजेशीर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड, स्टंट, भांडण आणि डान्स याशिवाय आपल्याला आणखी भन्नाट अशा गोष्टी पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून लोक हसून हसून लोटपोट झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी वर्गात काही वेगळंच करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण अभ्यासाऐवजी एका तरुणीच्या डोक्यातील उवा काढताना दिसतोय. हा अनोखा आणि मजेदार प्रकार पाहून लोकांना हसू आवरत नाही. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या व्हिडिओने सर्व सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक क्लास रुम दिसत असून चार विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहे. यामध्ये एक तरुणी अभ्यास करत आहे. तर एक तरुण तरुणी एकत्र बसले आहे. नवल म्हणजे तरुणी बेंचवर डोके ठेवून झोपली आहे आणि तरुण अतिशय गंभीरपणे तरुणीच्या केसांमधून उवा शोधताना दिसत आहे. तर एक विद्यार्थी याचा व्हिडिओ र२कॉर्ड करत आहे. हे दृश्य पाहून लोकांनी त्वरित मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने विचारले आहे की, ‘हा अभ्यासाचा नवीन मार्ग आहे का?’ तर दुसऱ्या एका युजरने विचारले आहे की, ‘खरं प्रेम असं असतं!’ आणखी एकाने ‘अभ्यास सोडून प्रेमाचा वेगळाच प्रकार दिसतोय, ‘असे म्हटले आहे. व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेला प्रेमाचा अनोखा प्रकार म्हटले तर काहींनी हसण्यावारी घेतले आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लाखोंनी पाहिला असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.