फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, भांडण आणि जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड करणाऱ्यांचे तर अनेक भन्नाट भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. या जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की, यामुळे त्यांच्या वेळही वाचतो आणि पैसाही वाचतो.
सध्या असात एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर तुम्ही तहा प्रेमी असाल तरी हा जुगाड तुमच्या कामी येईल. एका तरुणाने बाईकपासून चहाचे एटीएम बनवले आहे.विशेष म्हणजे हे एटीएम घेऊ तुम्ही फिरु देखील शकता. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दिसत आहे. तो त्याच्या बाईपासी उभा आहे. तसेच त्याच्या बाईकच्या मागच्या बाजूला एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये तरुणाने एक चहाचा कप ठेवलेला आहे. तो तरुण चहाचा कप काढतो आणि बाईकच्या पुढे घेऊन जातो. त्यानंतर बाईतच्या हेडलाईटच्या ठिकाणी एटीएम स्वाईप करतो आणि नंतर जे घडते ते पाहून तुम्ही आवाक् व्हाल. कार्ड स्वाईप केल्यानंतर बाईतच्या पुढच्या भागातून कपात चहा पडतो. असा भन्नाट जुगाड पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sirswal.sanjay यटा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. अनेक चहाप्रेमींनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, भारीच आता कुठेही कधीही चहा पिण्याचे टेन्शन नाही. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, कसे बनवले हे तुम्ही मला पण सांगा ना. अशा अनेक प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चहाप्रेमींसाठी नवीन युक्त्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.