अंगातली मस्ती नडली! कोलांट्या उड्या मारताना तरुणासोबत 'असे' काही घडले की, पाहा VIDEO
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट , जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे स्टंट करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. स्टंट करताना अनेकांनी आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे या मुलाने कोलांट्या उड्या मारल्याने असे काही घडले आहे की पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तुम्हाला माहितच असेल की मजा -मस्ती करणे कोणीही सोडत नाही. मग ते लहान व्यक्ती असो किंवा मोठे काही ना काही मस्ती चालूच असते. पण अनेकदा ही मस्ती आपल्या जीववार बेतते यामुळे आपल्या एकतर गंभीर दुखापत होते किंवा आपला जीव गमवावा लागतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे.
नेमकं काय घडले?
यामध्ये एक तरुण कोलांट्या उड्या मारत होता आणि त्याच्यासोबत असे काही घडले की, त्याच्या आसपासच्या लोकांना देखील धक्का बसला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक रस्त्याच्या कडेला झोपलेले आहे. त्यांच्या राहणीमानावरुन दिसून येते की हे लोक बहुदा रस्त्याच्या कडेला राहत असतील. तिथेच एक मुलगा ब्लॅंकेट्सवर कोलांट्या उड्या मारत आहे.
तसेच आजूबाजूचे लोक त्याला असा स्टंट करताना पाहत आहेत. तरुण एकदा-दोनदा कोलांट्या मारतो त्यानंतर परत ब्लॅंकेट सरळ करतो. परत एकदा कोलांटी उडी मारतो मात्र त्यानंतर तो उठतच नाही. त्याला असे पडलेले बघून बाजूचे लोक घाबरतात आणि त्याच्याजवळ जाऊन बघतात की, नक्की काय झाले. त्यानंतर सगळेजण त्याला उढवत असतात. पुढे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला असून त्या तरुणाला काही झाले नाही ना असा प्रश्न केला आहे. एका युजरने अंगातली मस्ती नडली अशी प्रतिक्रीया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, त्या एका कोलांटी उडी नंतर तो पाच मिनिटे उठला नसल्याने कदाचित त्याची मान मुरगळी वैगेर असे असा अंदाज बांधला जात आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.