रीलचा नाद लय बेकार! तरुण मेट्रो ट्रॅकवर स्टंट करायला गेला अन्...; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी जुगाड, तर कधी स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे तरुणांचे स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणी कधी कोणता धोकादायक स्टंट करेल हे सांगणे कठीण आहे. अनेकदा या स्टंटबाजीमुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण लोक स्वत:च्या जीवाचा देखील विचार करत नाहीत.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक मेट्रोसमोर धोकादायक स्टंट करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मात्र, हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. सध्या अशा रिल्समुळे सोशल मीडियावर चुकीचा संदेश पसरत आहे. असे व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
थोडक्यात जीव बचावला
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, युवक मेट्रोच्या ट्रॅकवर बिनधास्तपणे चालताना दिसत आहे, त्याच वेळी मागच्या बाजूने मेट्रो प्रचंड वेगाने त्याच्याकडे येत आहे. मेट्रो अगदी जवळ पोहोचते, तेव्हा युवक अचानक प्लॅटफॉर्मवर उडी मारतो आणि आपला जीव वाचवतो. मात्र, हा थरार पाहणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे. जर युवक क्षणभरही चुकला असता, तर हा स्टंट त्याच्या जीवावर बेतला असता. अनेकदा अशा लोकांना सुचना देउनही लोक स्टंट करायला जातात. स्टंटचे वाढते प्रमाण सध्या चिंतेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
yavaşça adamın kim olduğuna bakın aq şok oldum pic.twitter.com/7rNr7AMP3o
— baygara (@pancarmotoru351) December 6, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असेलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pancarmotoru351 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तरुणाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, हे मूर्खपणाचा कळस आहे. आणखी एका युजरने अशा लोकांवर प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठीच अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. हा व्हिडिओ फक्त मनोरंजणासाठी पाहणे देखील चुकीचे आहे. अशा घटना इतरांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.