फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहून धक्का बसतो. डान्स व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ, चित्रपट, तसेच जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे स्टंटबाजी करण्याचा प्रकार वाढला आहे. कोणी कधी कोणता धोकादायक स्टंट करेल हे सांगणे कठीण आहे.
अनेकदा या स्टंटबाजीमुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण लोक स्वत:च्या जीवाचा देखील विचार करत नाहीत. युवा पिढीने अशा प्रकारात आघाडी घेतली असली, तरी सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांना चकित केले आहे. या व्हिडीओमध्ये कोणी तरुण नव्हे, तर एक आजोबा चालत्या बाईकवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा बाईकच्या सीटवर बसण्याऐवजी गॅस सिलेंडरवर बसलेले आहेत. विशेष म्हणजे, ते बाईक हँडल हाताने न पकडता आपल्या पायाने बाईकचा बॅलन्स सांभाळत आहेत. हे सर्व करताना हसत आहेत, जणू काही त्यांना धोक्याची जाणीवच नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. त्यांनी बाईकवर सीलेंडर बांधला असून त्यावर बसून ते पायाने गाडी चालवत आहे. या दृश्याचा व्हिडिओ तेतून जाणाऱ्या एका कारचालकाने रॅकॉर्ड केलेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कार
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडीओ @fact_by_pratham या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला “बुढापे मे ये हाल है तो जवानी मे क्या क्या गुल खिलाए होंगे चाचा ने” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.आजोबांच्या या स्टंटबाजीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी टीका करत अशा स्टंटला मूर्खपणा म्हटले. एका युजरने म्हटले आहे की, ‘तारुण्याचे स्वप्न उतारवयात पूर्ण झाले आहे,’ तर दुसऱ्या एकाने ‘यांच्या अशा वागण्यानेच गॅस महाग झाला आहे’ असे म्हटले. आणखी एकाने ‘आजोबा आयुष्य जगले आहेत, आता त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही.’ असे म्हटले आहे.
अशा प्रकारचे स्टंट अनेकदा केवळ व्ह्यूज आणि लाइक्ससाठी केले जातात, पण यामध्ये जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा स्टंटबाजीचे अनुकरण करू नये, असे अनेकांनी सुचवले आहे. आजोबांचा हा व्हिडीओ मनोरंजनासाठी चर्चेत असला, तरी त्यातून सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होऊ नये, हे अधिक महत्त्वाचे आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कार
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.