Viral Video young man's head got stuck in an escalator shocking incident video goes viral
सोशल मीडियावर रोज लाको व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. शिवाय, अनेक थरारक घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणासोबत थरारक अपघात घडला आहे. इलेक्ट्रिक एस्केलेटर चढत असताना त्याची एक चूक त्याला महागात पडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेकदा तरुणांना त्यांची मस्ती, खोडकरपणा आंगलट येतो. असेच काहीसे या तरुणासोबत घडले आहे. तरुणाची मस्ती त्याला चांगलीच महागांत पडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मॉलचा परिसर दिसत आहे. मॉलमध्ये अनेक लोकांची शॉपिंगसाठी गर्दी जमली आहे. दरम्यान काही लोक इलेक्ट्रिक एस्केलेटरवरुन वरच्या मजल्यावर जात आहे. यातच एक तरुण ही आहे. तो एस्केलेटर वर जात असताना बाहेरच्या बाजूला वाकण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान त्याची मान एक्सलेटरमध्ये अडकते आणि तो वर उचलला जातो. तुम्ही पाहू शकता की, लोकांना कळताच लोक मदतीसाठी त्वरित धावून येतात. त्याचे डोकं काढण्यासाठी एस्केलेटर बंद करुन हतोड्याने अडकलेला भाग तोडतात आणि त्याला बाहेर काढतात. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असते. त्याला बाहेर काढल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते. अनेकदा आपली छोटीशी चूक, मस्ती देखील किती महागांत पडू शकते हा व्हिडिओ याचे उदाहरण आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातील नसून परदेशातील, चीनमधील असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kingxchannel90 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्या मुलाची चूक त्याला नडली, तर दुसऱ्या एका युजरने किती भयानक आहे. तिसऱ्या एकाने मस्ती आंगलट आली असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.