VIDEO: एसी लोकलमध्ये तरुणींचा एकमेकींना फटकावत तुफान राडा; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी जुगाड, तर कधी स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
याशिवाय तुम्ही भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा शुल्लक कारणांवरुऩ लोक भांडण करायला लागतात. ट्रेेनमधील भांडणाचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक एसी लोकलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काहीजण ट्रेनच्या सीटवर काहीजणी बसल्या आहेत तर काहीजणी जागा नसल्याने उभ्या राहिल्या आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी ट्रेनमध्ये दिसत आहे. एक तरुणी खिडकीजवळ उभी आहे. ती तरुणी आणि सीटवर बसलेल्या महिलांमध्ये कोणत्यातरी कारणांवरुन वाद सुरू होतो. काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये होते. उभी असलेली तरुणी त्या महिलांना पायाने मारते. तसेच आणखी एक तरुणी त्यांच्या भांडणांत पडते तर तिला देखील शब्दांनी फटकारते. सीटवर बसलेल्या महिला देखील त्या उभ्या असेलल्या तरुणीला तिथे उभे राहून देत नसतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @japinder0075 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असनू अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एक युजरने म्हटले आहे की, हे रोजचे झाले आहे, यांना भांडण करुन कंटाळा येत नाही का, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या महिला कुठेही भांडणाला सुरूवात करतात. आणखी एका युजरने म्हटले आहे की, नक्की चुक कोणाची आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, काहीही म्हणा, पण मुलींची भांडणे बघायला मज्जा येते. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.