ट्रेनमध्ये बसण्यासाठी केला अप्रतिम जुगाड
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या तर अजिबात कमी नाही. लोक असे असे जुगाड करतात की विश्वास बसत नाही. जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की, यामुळे पैसे आणि वेळही वाचतात. काही वेळा असे जुगाड उपयोगी येतात. तर काही वेळा जुगाड खूप भारी पडतात. सध्या एका जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत.
जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही तर उभे राहतो. पण या तरूणाने ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही म्हणून असा जुगाड केला आहे की अनेकजण त्याच्याकडे बघत राहिले आहेत. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
तुम्ही कधी अशी सीट पाहिली आहे का?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल ट्रेनचा आहे. ट्रेन कोणत्याही प्रकारची असो, लोकांना बसण्यासाठी जागा नेहमीच दिली जातात. पण अनेक वेळा गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये बसायला जागा मिळत नाही. असाच प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला. यानंतर त्यांनी एक अप्रतिम व्यवस्था केली. त्याने वरील हँडलवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी चादर बांधली आहे. यानंतर, तो हँडलला लटकत चादरीवर बसला. अशा प्रकारे त्याने स्वत:साठी बसण्याची व्यवस्था केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – अरेच्चा! उंटाला अल्टो कारमध्ये बसवले; लोक म्हणाले, हा चमत्कार कसा घडला?
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
rahulmehto2525 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारोहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, ‘तो स्पायडरमॅन बनला आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘त्याने योग्य व्यवस्था केली आहे.’ तर तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘मीही आता तेच करेन.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हे मधमाशांच्या पोळ्यासारखे दिसते.’