फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी इतके विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात की पाहून किळस येतो. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, पाहून हसू आवरता येत नाही, माणूस हसून हसून लोट पोट होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की हा चमत्कार कसा घडला.
आत्तापर्यंत तुम्ही कुत्रा, मांजर, किंवा यांसारख्या लहान प्राण्यांना गाडीतून जाताने बघितले असेल. तसेच वाघ आणि सिंहाला देखील तुम्ही गाडीत बसलेले पाहिले असेल. पण तुम्ही कधी उंटाला कारमध्ये बसलेले बघितले आहे. असा विचार देखील कधी मनात आला नसेल. त्याच्. उंचीमुळे आणि शरीराच्या वेगळ्या आकारामुळे त्या एखाद्या कारमध्ये बसवणे कसे शक्य आहे. त्या टॅम्पोत वैगेरे बसवता येते. पण कारमध्ये कसे बसवायचे.
अल्टो कारचा असा वापर तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल
मारूती अल्टो कारचा असा वापर तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. अल्टो कारच्या मालकाने कारचे रूपांतर मालगाडीत केले. अल्टो हाताळू शकतील त्यापेक्षा जास्त उपकरणे त्यावर लोड करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अल्टो कारच्या वर बांबूचे काही खांब लावण्यात आले आहेत. नंतर त्यावर गोण्यांमध्ये धान्य ठेवले जाते. त्यावरही काही लोक आरामात बसलेले असतात. यासोबतच लोक गाडीच्या आत अडकले आहेत. अल्टो कारमध्ये एक शेळी आणि उंट बसलेले दिसले तेव्हा सर्वात आश्चर्याची गोष्ट होती. कारच्या खिडकीतून उंट आणि बकऱ्याची मुंडकी बाहेर चिकटून असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही अल्टो कार पाहिल्यानंतर गाडीवर 10 पट अधिक भार टाकल्याचा दिसत आहे.
हे देखील वाचा – आश्चर्य! चक्क मासा टाकून बनवला चहा; व्हिडीओ पाहून चहाप्रेमी चक्रावले, म्हणाले…
व्हायरल व्हिडीओ
लोकांना बसला आश्चर्यचा धक्का
उंट गाडीच्या आत कसा बसला होता? हा चर्चेचा विषय बनला आहे. ज्या लोकांनी ही गाडी पाहिली त्यांच्या मनात एकच प्रश्न होता की या गाडीच्या आत उंट कसा बसवला गेला? मात्र, कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोक म्हणाले की उंट आधी बसवला गेला असावा, नंतर त्याच्या वर गाडी बांधली गेली असावी. त्याच वेळी, इतर काही लोकांनी सांगितले की त्यांनी आजपर्यंत अल्टो कारचा असा वापर कधीच पाहिला नाही. @rajlove7594 नावाच्या पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिली आणि हजारो लोकांनी लाईक केला आहे.