viral video zebra mother saved her child from lioness video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे प्राण्यांचे देखील अनेक मनोरंजक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहे. यामध्ये प्राण्यांची जीवनशैली आपल्याला दिसून येत आहे. अनेक आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ असातात. ज्यामध्ये प्राणी कसे राहतात, कसे संकटावर मात करतात अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
सध्या असाच एका झेब्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला पिल्लाला वाचवण्यासाठी झेब्रा एका सिहिंणीश लढत आहे. एका सिहिंणीने झेब्राच्या पिल्लावर त्याच्या आईसमोर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आईने सिहिंणीला असा धडा शिकवला की, तिने तिथून पळ काढला.यावरुन आपण लक्षात घेऊ शकतो की, केवळ मानवामध्येच नव्ह तर प्राण्यांमध्ये देखील भावना असते. आई कोणतीही असो आपल्या पिल्लासाठी यमराजाशी देखील लढते. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक झेब्राचा कळप गवत खातना दिसत आहे. याच वेळी सिहिंणींचा देखील एक कळप दबक्या पावलांनी झेब्राची शिकार करण्यासाठी येत असतो. एक सिहिंणी झेब्राच्या कळपातील पिल्लावर हल्ला करायला लागते. हल्लाची चाहून लागताच झेब्राचा कळपजीव वाचवण्यासाठी धावायला लागतो. याच वेळी पिल्ला देखील आपला जीव वाचवण्यासाठी धावत असते. इतक्या सिहिंणी त्याच्याव हल्ला करणारच असते. त्याच वेळी पिल्लाची आई येते आणि सिहिंणीला लाथ मारुन पिल्लाच्या मागे पळायला लागते. जेणेकरुन सिहिंणी पिल्लावर हल्ला करणार नाही. सिहिंणी दोन वेळा पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण पिल्लाची आई त्याला लाथ मारुन मारुन धोबी पछाड करते. अखेर सिहिंणी पिल्लाच्या मागे धावणे थांबवते आणि तिथून निघून जाते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अलीकडे वन्य प्राण्यांशी संबंधित असे अनेक फोटो, व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहाला मिळत आहे. यातील अनेक व्हिडिओ इतके रोमांचक असतात की पाहून आश्चर्य वाटते. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @natureismetalया अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. अनेकांनी आईचे प्रेम बाकींच्याच्या प्रेमापेक्षा जास्त असते असे म्हटले आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आले, प्राण्यांचे जीवन किती अद्भुत असेत असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.