प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळ! चिमुकल्याचा हात सापच्या विळख्यात अन् कुटुंब शूटिंग करण्यात व्यस्त, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे प्रसिद्धसाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडियाल लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मिळवण्यासाठी लोक अगदी लहान बाळांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्ये एका बाळाच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील सदस्य या दृश्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहेत. त्यांनी बाळाचा जीव जाण्याची कोणतीही भीती नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकल्याच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. चिमुकला आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सापाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. मात्र कुटुंबातील सदस्या याचा व्हिडिओ बनवत आहेत. आजूबाजूला आणखी काही चिमुकले खेळताना दिसत आहेत. साप चिमुकल्याच्या पायालाही वेढा घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण चिमुकला उभा राहतो. कुटुंबातील सदस्य चिमुकला घाबरेला पाहूनही त्याला मदत करत नाहीत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @vivek_choudhary_snake_saver या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. पण अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने काय मुर्खपणा आहे हा असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने बाळ किती घाबरलेले आहे, त्याला पहिल्यांदा सापापासून दूर करा असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने पालकांना निष्काळजीपणा एक दिवस नडणार असे म्हटले आहे. तर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने दावा केला आहे की, साप धामण आहे यामुळे घाबरण्याची गरज नाही. तो विषारी नाही. पण एकाने याला उत्तर देत म्हटले आहे विषारी नसला म्हणून काय झाले बाळाला त्रास तर होत आहे ना असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून कुटुंबातील लोकांवर कारवाई व्हावी असे म्हटले जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.