
लग्न एक बायका चार! लग्नाच्या फेऱ्यांमध्ये वधूच्या मैत्रिणींचा घोळ, दृश्य पाहून भडजींनाही हसू झालं अनावर; Video Viral
मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लाल रंगाचा लेहेंगा घातलेली वधू वरासह अग्नीसमोर फेरे घालताना दिसली. तिचा लेहंगा फार जड आणि भरगच्च असतो ज्यामुळे तिला नीट चालता येत नाही. आता या लग्नात वधूच्या काही फाॅरेनर मैत्रिणी आलेल्या असतात ज्या तिची मदत करण्यासाठी धाव घेतात आणि वधूचा लेहंगा पकडून तिच्यासोबत मागे मागे फेऱ्यांमध्ये सामील होतात. त्यांना असं करताना पाहून सर्वच थबकले आणि मागून एक आवाज आला की, “नाही, नाही, तुम्ही लोक, एकत्र चालू नका… नाहीतर तुम्हालाही विवाहित मानले जाईल!” हे ऐकूण वधू-वरासह सर्वांनाच हसू अनावर होतं आणि वातावरणात हास्याचा कल्लोळ माजतो. यानंतर वधूने आपल्या मैत्रिणींना परिस्थिती समजावून सांगितली, ज्यानंतर ते मंडपापासून दूर गेले आणि बाजूला बसले.
लग्नसमारंभातील हा मनोरंजक प्रसंग लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्याला ६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्साहाने प्रतिसाद दिला, एका युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचे सर्वात अनोखे फेरे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून छान वाटलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “धर्मनिरपेक्ष भारत, हा खूपच हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे”. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @chaudhary.__.kanishka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.