(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंड करत असून यात एक माणूस मासे पकडण्यासाठी आनंदाने पाण्यात उडी मारत असल्याचे दिसते. त्या माणसाच्या हातात मासे पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. तो माणूस खूप काळजीपूर्वक पाण्यात उडी मारतो. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि पाण्यात डुबकी मारतो आणि मासा शोधण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्याला पकडू शकेल. माणूस आजूबाजूला पाहतो पण त्याला काहीच दिसत नाही. पण नंतर पाण्यात एक जोरदार हालचाल जाणवते आणि मागे वळून पाहताच त्याला एक भलीमोठी मगर दिसायला लागते. मगरीला पाहताच व्यक्ती घाबरतो आणि संपूर्ण दृश्य भीतीदायक बनते.
आपला जीव वाचवण्यासाठी व्यक्ती पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो खरा पण मगर त्याच्यावर इतका वेगात हल्ला करते की त्याला आपलं जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाण्याच्या वर व्यक्तीच्या वस्तू तरंगताना दिसतात ज्या तो मासे पकडण्यासाठी घेऊन आलेला असतो पण तो व्यक्ती मात्र शेवटच्या या दृश्यात दिसून येत नाही. अनेकांनी आता व्हिडिओच्या विश्वसार्हतेवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून व्हिडिओला AI द्वारे बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. पण खरं सत्य काय हे मात्र अद्याप एक गूढच आहे. घटनेचा व्हिडिओ @maxguitarr नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






