(फोटो सौजन्य – X)
काय आहे प्रकरण?
रिक्षाचालक मोहनने आरोप केला की त्याच्या ऑटोमध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम झाला होता. वारंवार तक्रारी करूनही कंपनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत नव्हती. एकदा तर मोहनने काही दिवसांपूर्वी, त्याची ई-रिक्षा गाढवाच्या मदतीने सर्व्हिस सेंटरमध्ये ओढून नेली होती. पण तरीही कंपनीने त्याला कोणतीही मदत केली संतापात त्याने आपल्या ई-रिक्षाच आग लावून टाकली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. जोधपूरच्या बजाज शोरूमबाहेर, मोहनने त्याच्या ऑटोवर पेट्रोल ओतले आणि आग लावली. यावेळी त्याची पत्नीही त्याच्या सोबत होती, जिला हे सर्व पाहताच अश्रू अनावर झाले.
शोरूम के बाहर अपना ही ई-रिक्शा फूंका
जोधपुर में बजाज शोरूम के बाहर एक युवक मोहन सोलंकी ने खुद के ई-रिक्शा को पेट्रोल छिड़ककर आग लगा दी। इस दौरान मोहन की पत्नी दहाड़ें मार मार कर रोती रही। भाई वीडियो बनाता रहा। मोहन का आरोप है कि ई रिक्शा की बैटरी खराब थी और कोई सुनवाई नहीं हो… pic.twitter.com/l5v9Ry58sg — Arvind Chotia (@arvindchotia) December 30, 2025
मोहनचा आरोप आहे की ई-रिक्षाची बॅटरी खराब होती आणि तो अनेक दिवसांपासून त्याबद्दल तक्रार करत होता, पण कोणीही ऐकत नव्हते. ऑटोचा मायलेज कमी झाला होता. कंपनीकडून योग्य मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या मोहनने ऑटो पेटवून दिला. दुसरीकडे, बजाज शोरूम ऑपरेटर हरीश भंडारी यांनी मोहनच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे की, तपासणीत सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले होते पण तरी मोहन त्याच्यावर ई-रिक्षा बदलण्यासाठी अनावश्यक दबाव आणत होता. दरम्यान घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने मात्र कंपनीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “मी त्यांची उत्पादने खरेदी करणे बंद केले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बॅटरी खराब होती, आणि जर प्रकरण ऐकले जात नव्हते, तर बॅटरी विकत घेऊन ती दुरुस्त करता आली असती असे तिला जाळून टाकणे फार नुकसानदायक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एकदा गाडी विकली की, सर्व शोरूम मालकांची परिस्थिती सारखीच असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






