चंद्र दूर की दिल्ली? विद्यार्थ्याचे भन्नाट उत्तर
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल जे पाहून खूप आश्चर्य वाटते. सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर रील्स बनवून शेईर करत असतात. शाळा-महाविद्यालयाशी संबंधित व्हिडिओ देखील नेहमी व्हायरल होत असतात. कधी मुलांची खोडकर तर कधी प्रभावी शैली यात पाहायला मिळते. कधी एखाद्या ट्रेंडिंग गाण्यावर शिक्षक विद्यार्थ्यांचा डान्स पाहायला मिळतो. तर कधी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्नोत्तरांचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होतात. लहान मुले तर विचारलेल्या प्रश्नांचे भन्नाट उत्तर देतात.
सध्या असाच एक व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये एक शिक्षक मुलाला चंद्र आणि दिल्लीमधील अंतर विचारत आहे. शिक्षकाच्या प्रश्नाला मुलाच्या उत्तराने संपूर्ण वर्गासह सरांनाही धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रीया देत आहे.
मुलाचे भन्नाट उत्तर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिक्षक वर्गात एका मुलाला त्याच्या जवळ बोलावतात. मग त्यांना प्रश्न विचारत असतात. ते एका मुलाला विचारतात की, ‘आपल्यापासून चंद्र दूर आहे की दिल्ली?’ त्यांचे प्रश्न ऐकून मूलगा काही वेळ गप्प राहतो आणि मग असे उत्तर देते की शिक्षकांना देखील त्यावर विश्वास बसत नाही. या प्रश्नावर मुलाने दिल्ली दूर असल्याचे सांगितले आहे. हे ऐकून शिक्षक त्याला विचारतात कसे? यावर बालक म्हणतो, ‘आम्हाला चंद्र दिसतो पण दिल्ली नाही.’ मुलाच्या उत्तराने शिक्षक थक्क झाले आहेत. समोरून असे प्रत्युत्तर येणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
हे देखील वाचा- रस्त्यावर उतरून महिला शोधू लागली नवरा; व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ
क्या Logic दिया भाई ने ❤️😅 pic.twitter.com/jou8vg7u5a
— Deepak (@Putkuuu) August 14, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Putkuuu अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला कॅप्शन देताना ‘बरेलीची मुले कधीही चुकीची असू शकत नाहीत.’ असे लिहले आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘भाई, मी एक दिवस इस्रो जॉईन करेन.’, तर आणखी एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही काय लॉजिक दिले आहे’ दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, त्याचे म्हणणे बरोबर आहे, मी देखील रोज चंद्र पाहतो, पण दिल्ली पाहायला मिळत नाही. अशा प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.