फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अलीकडे लव्ह मॅरेजचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांना त्यांच्या आवडीच्या मुलीशी, मुलाशी लग्न करायचे असते. त्यांना वाटते की आपल्याला ओळखणारी आणि आवडणारी मुलगी त्यांच्यासाठी चांगली जीवनसाथी असेल. पण याशिवाय काही लोकांना अरेंज मॅरेज करायला आवडते. एकमेकांना जाणून आणि समजून घेऊन आयुष्य चांगले जाईल असे त्यांना वाटते.
पण या सगळ्यांशिवाय काही लोक वेगळ्या पद्धतीने वधू किंवा वर शोधतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध नवऱ्याचा शोध घेत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या पुरूषांना ती प्रपोज करत आहे. पण ती असा प्रश्न विचारत आहे जो ऐकून अनेकंना धक्का बसला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा काय प्रश्न आहे? तर ही मुलगी स्वतःसाठी श्रीमंत नवऱ्याच्या शोधात आहे.
व्हिडीओत काय?
लीला लेझेल असे या महिलेचे नाव आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लीला रस्त्याने चालत आहे. तेवढ्यात समोरून एक माणूस येतो. ती मुलगी त्याला पाहताच लगेच त्याच्या जवळ जाते. ती त्या माणसाला विचारते की मी श्रीमंत नवरा शोधत आहे. मला आशा आहे की तो सापडेल. मग लैला लगेच त्या माणसाला विचारते, तू सिंगल आहेस का? अशा स्थितीत तो माणूस लगेचच नाही, माझे लग्न झाले आहे असे सांगून निघून जातो. यावर मुलगी म्हणते की हे चांगले आहे. तुमची पत्नी भाग्यवान आहे की तुमच्यासारखा श्रीमंत कोणीतरी आहे. यानंतर ती लगेच इतर दोन लोकांकडे जाते. त्यांच्यात बसून ती विचारते मी माझ्यासाठी नवरा शोधतेय. तुम्ही दोघेही सिंगल आहात का? तर ते काही उत्तरे देत असे. त्याच वेळी पहिल्यांदा ज्या माणसाला तिने प्रश्न विचारला तो पुन्हा तिथून जातो. आणि त्या लोकांना त्या महिलेपासून दूर राहण्यास सांगतो. मात्र, लैलाने हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवला असावा. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
लैलाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 65 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लैलाने तिच्या इंस्टाग्रामवर असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका महिला युजरने लिहिले आहे की, ‘कोण रस्त्यावर कुणाकडे जाऊन म्हणतो की तिला श्रीमंत नवरा हवा आहे?’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘पुरुषांना त्रास देणे थांबवा. जर एखाद्या पुरुषाने अशा स्त्रियांना प्रपोज केले असते तर काय झाले असते याची कल्पना करा.’