योगा करताना महिलेच्या समोर प्रकट झाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर; कॅमेरा पाहताच पिसारा फुलवू लागला अन् मंत्रमुग्ध करणारा Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. अशातच एक सुंदर आणि सर्वांना सुखावून जाणारा एक व्हिडिओ सध्या इथे व्हायरल झाला आहे. घराच्या छतावर योगा करताना महिलेसोबत एक आश्चर्यकारक घटना घडून आली आणि याचाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. घडलं असं की महिला छतावर शांत बसून योगा करत होती आणि त्याचवेळी अचानक तिथे एक मोर आपली उपस्थती दर्शवतो आणि महिलेच्या समोर उभा राहून आपल्या सुंदर पिसारा फुलवू लागतो. मोराची ही कृती आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक व्हिडिओ पाहून चांगलेच खुश झाले आहेत.
मोर हा काही साधारण पक्षी नाही, त्याचे सुंदर रूप आणि रंगांनी भरलेला सुंदर पिसारा पाहण्यासाठी अक्षरशः लोक कासावीस होतात. आपल्या या सौंदर्यामुळेच त्याला भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याची जागा देण्यात आली आहे. मोर हा अधिकतर जंगलात किंवा अभयारण्यातच दिसून येतो ज्यामुळे मानवी वस्तीत त्याला पाहताच लोक थक्क होतात आणि डोळे भरून त्याचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवू लागतात. व्हिडिओमध्ये, योगा करणाऱ्या एका महिलेसमोर अचानक एक मोर येतो आणि त्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करतो. हे दृश्य इतके अद्भुत आहे की पाहणारे हसणे थांबवू शकत नाही. सुरुवातीला, महिला तिच्या छतावर योगाभ्यासात मग्न असल्याचे दिसते. ती पूर्ण शांततेत आणि एकाग्रतेने बसलेली असते, परंतु अचानक, जणू काही आकाशातून एखादी भेटवस्तू खाली येत असल्याप्रमाणे, एक मोर छतावर येतो. प्रथम, तो फिरतो, नंतर थेट त्या महिलेकडे जातो. थोड्याच वेळात, तो तिच्यासमोर उभा राहतो आणि पंख पसरून आपला पिसारा फुलवू लागतो.
या मोराला पाहून असे वाटते की जणू तो एखाद्या स्टेजवर सादरीकरण करण्यासाठी आला आहे. गोल गोल फिरताना त्याचे पंख चमकतात आणि वातावरण आणखी चैतन्यशील बनवतात. दरम्यान हा मोर छतावर नक्की कुठे आणि कसा आला याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडिओ @Star knowledge world नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.