असा पलटला डाव! पाण्यात लपून बसली होती मगर; म्हैस येताच वाऱ्याच्या वेगाने हल्ला केला पण..., पाहा नेमकं काय घडलं?, Video Viral (फोटो सौजन्य : व्हि़डिओ स्क्रीनशॉट)
Crocodile Attack on Buffalo : सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून हसून हसून पोट दुखून येते, काही आश्चर्यकार असे व्हिडिओ पाहायाल मिळतात. गेल्या काही काळात वन्यजीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कधी वाघाचा हल्ल्याचे, तर कधी सिंहाच्या हल्ल्याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. अनेक प्राण्यांचे शिकार करतानाचे, शिकारीचा आनंद लुटतानाचे, तर काहींची शिकार फसतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मगर म्हशींच्या कळपावर हल्ला करत, परंतु याचा परिणाम उलटा होतो आणि तिला तिथून पळ काढावी लागते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नदीच्या काठावर काही म्हशी पाणी पित उभ्या आहेत. याच वेळी म्हशींचा कळप अचानक उधळायला लागतो. कारण अचानक एक मग एका म्हशीवर हल्ला करते. मग पाण्यात लपून बसलेली असते. ती अगदी वाऱ्याच्या वेगाने म्हशीवर हल्ला करत तिचे तोंड जबड्यात पकडते. यामुळेच सर्व म्हशी घाबरुन सैरावरा पळू लागतात. मगरीच्या तावडीत सापडलेली मगरही घाबरते, पण ती धीर सोडत नाही. ती तशीच मगरीला खेचत खेचत वर आणते. पण तरीही मगर म्हशीला सोडत नाही, मग म्हैस पुन्हा प्रयत्न करते आणि मगरीला आणखी वर आणते. यावेळी इतर म्हशी तिच्या जवळ येतात. पण हे पाहून मगर पाण्यात पळ काढते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
— Damn Nature You Scary (@AmazingSights) September 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AmazingSights या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने धैर्यापुढे कितीह वाईट संकट आले तरी टीकत नाही असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने मगरीला समजले असे नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.
माणूस आहे की राक्षस? जिवंत ऑक्टोपसला चावून चावून चटकारे घेत खाल्ले; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.