
Why NRI Hesitate to Return Homeland
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कंटेट क्रिएटर सारिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट @sarika_in_america वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सारिका व्हिडिओमध्ये सांगते की, परदेशात गेलेल्या भारतीयांचे मायदेशी परतणे कठीण असते. तिने याची सोप्या आणि व्यावहारिक शब्दांत मांडणी केली आहे. सारिक म्हणते की, भारतात पदवीधर लोकांना महिन्याला २५ ते ४० हजार पगार मिळतो, तर या उलट अमेरिकेत केवळ कॅब चालवणाऱ्यांना दरमहा २,१०,००० ते २,५०,००० सहज मिळतात. याशिवाय भारतात स्वत:चे घर खरेदी करायचे असले तरी १५ वर्षे वाट पाहावी लागले. मात्र अमेरिकेत केवळ चार ते पाच वर्षात हे स्वप्न पूर्ण होते. तसेच अमेरिकेतून भारतात ५०० रुपये पाठवले तर त्याची किंमत ४१ हजार ५०० रुपयाच्या आसपास होते. यामध्ये भारतात शिक्षण घेणाऱ्या मुलांची फी भरणे, औषधे, आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची सहज खरेदी होते. तर भारतात ४० हजार कमवणारा व्यक्ती हा घरखार्चासाठी आणि वैयक्तिक खर्चासाठी संघर्ष करत असतो.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओच्या शेवटी सारिकाने भारताबद्दल द्वेष नसून केवळ व्यावहारिक ज्ञान तिने सांगतिले असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीयांना अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये केवळ पाच ते सात वर्षे जावे, पैसे कमवावे, शिक्षण घ्यावे आणि इच्छा असल्यास पुन्हा भारतात परतावे असा सल्ला सारिकाने दिला आहे. परतु या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर दोन गटांमध्ये युद्ध सुरु आहे. काहींनी सारिकाचे समर्थन केले आहे, तर काहींनी कुटुंब आणि आपल्या देशाच्या मातीत जगण्याचा आनंद वेगळाच असतो असे म्हटले आहे. आता तुम्हाला काय वाटते हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला नक्की कळवा.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.