(फोटो सौजन्य – Instagram)
काय आहे प्रकरण?
या तरुणाचे नाव आल्ड, एडवर्ड असे आहे, तो स्वीडनमधील नागरिक आहे. इंडोनेशियाच्या आपल्या मित्रासोबत तो नवी मुंबईतील वाशी येथे मित्राच्या लग्नासाठी आलेला असतो. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तो लग्न आटोपून तो तिथून निघाला. पण रस्ता चुकल्याने तो वाशी ऐवजी सानपाडा पाम बीचकडे परिसरात आला. इथे काही लोक त्याचा पाठलाग करत होते. त्यामुळे तो धावत धावत सानपाडा, सेक्टर एक मधील साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत आला, असे त्याने स्वतः सांगितले. सोसायटीच्या लिफ्टमधून तो वर जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र याचवेळी त्याचा तो अचानक तिथल्या पायऱ्यांवरुन घसरला ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर त्याला मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात दाखल करण्यात आले जिथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राला माहिती देताच त्याने रुग्णालयात धाव घेतली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मित्र प्रणय शहा याने सानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, “आल्डे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की त्याने प्रथम इमारतीच्या गेटवरून उडी मारली आणि तो पडला. आम्हाला संशय आहे की तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोस्टमार्टम पेंडिंग आहे”.
आल्डच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी नवी मुंबई पोलिस अधिकृत माध्यमांद्वारे स्वीडिश दूतावासाशी संपर्कात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सानपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आल्डचा हा करुण अंत व्यवस्थेतील त्रुटींचे कठोर वास्तव समोर आणत असून या प्रकरणामुळे परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा अधोरेखित केले जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






