Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

शाहूवाडी अभयारण्यालगत असलेल्या बफर झोनमधील विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील उरवळू, उदगिरी, निनाई परळे, आंबा व आजूबाजूच्या गावांमध्ये बिबटे, वाघ आणि गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 06:10 PM
Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील
Follow Us
Close
Follow Us:
  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका
  • जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील
कोल्हापूर : शाहूवाडी अभयारण्यालगत असलेल्या बफर झोनमधील विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील उरवळू, उदगिरी, निनाई परळे, आंबा व आजूबाजूच्या गावांमध्ये बिबटे, वाघ आणि गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. या संदर्भात हरीश कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केलेल्या जनहित याचिकेची न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. याबाबतीत न्यायालयाची संवेदनशीलता व तत्परता दिसून आली आहे. कारण याचिकाकर्त्यांनी ‘तातडीच्या सुनावणीसाठी’ विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने, ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती आर.जी. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर झाली.

दोन्ही न्यायमूर्तीनी गावकऱ्यांच्या वेदना अत्यंत संवेदनशीलतेने समजून घेत न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली. न्या. अवचट यांनी हे निरीक्षण नोंदवले की, ‘वन्यप्राणी आता केवळ ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही शिरकाव करत आहेत, ही चिंतेची बाब आहे.’ न्यायालयाने स्वतःहून विचारणा केली की, ‘हल्ल्यात बळी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या गावकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशी नुकसान भरपाई मिळते का?’ याचिका दाखल केल्यानंतरही त्या भागात ३०जानेवारी २०२६ रोजी एका ७ वर्षाच्या राजवीर पाटील या बालकाचा बळी गेला आहे. ८ वर्षीय स्वरांजली पाटील या मुलीस बिबट्याच्या जबड्यातून तिच्या १२ वर्षीय भावाने वाचवले. त्यामुळे ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे.

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

सुरक्षेसाठी न्यायालयाचे सरकारला खडे बोल
न्यायालयाने सरकारी पक्षाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत. याचे स्पष्टीकरण दि.५ मार्च रोजी द्यावे. तसेच याबाबत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

सरकारी वकिलांनी यावेळी दिली कबुली
सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी देखील मान्य केले की, तेथे समस्या आहे आणि लोकांची तक्रार आहे. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, त्या सरकारकडून आणि संबंधित विभागाकडून तातडीने सूचना मागवत आहेत.

या याचिकेद्वारे याचिकाकर्ते अ‍ॅड. हरीश कांबळे, वकील अ‍ॅड. रविराज बिरजे, अ‍ॅड. योगेश सावंत, अ‍ॅड. कार्तिक पाटील यांच्या वतीने प्रामुख्याने सौर कुंपण, तातडीची वैद्यकीय मदत, शालेय सुरक्षा अंतर्गत सुरक्षित स्कूल बसची व्यवस्था करणे, पडीक जमिनी आणि जीवितहानीसाठी सन्मानजनक नुकसान भरपाई देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्ते है स्वतः बफर झोनमधील रहिवासी असून, पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे हजारो गावकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Web Title: Kolhapur petition in high court regarding wild animal attacks citizens lives are difficult due to animal terror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ
1

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप
2

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
3

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Ahilyanagar News : नवे रस्ते फोडणार? अहिल्यानगरमध्ये गॅस पाईपलाईन योजनेवरून सत्ताधारी आक्रमक
4

Ahilyanagar News : नवे रस्ते फोडणार? अहिल्यानगरमध्ये गॅस पाईपलाईन योजनेवरून सत्ताधारी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.