रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
सोशल मीडियावर आता रेल्वे स्टेशनवरील एक मजेदार पण तितकाच धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक पत्नी आपल्या पतीला बेदम मारहाण करताना दिसून आली. पत्नी पतीला इतक्या जोरदार चोप देते की पाहून सर्वच थक्क होतात. मारामारीचा हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक आता वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. पती-पत्नीतील वाद ही एक सामान्य गोष्ट आहे मात्र सध्याच्या या घटनेतील पत्नीच्या रुद्रावताराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
काय आहे व्हिडिओत?
रेल्वे आणि रेल्वे स्थानकांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधी सीटसाठीची मारामारी तर कधी अपघाताशी संबंधित व्हिडिओ लक्ष वेधून घेतात. आताही असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला ज्यात पती पत्नीतील वाद इतका वाढतो की पत्नी थेट स्टेशनवरच पतीला मारहाण करू लागते. यात पत्नी अशाप्रकारे पतीला मारते की सर्व पाहतच राहतात.
लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओमध्ये पत्नीने पतीला पूर्ण ताकदीने उचलत जमिनीवर फेकल्याचेही दिसून येते, यानंतर तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. नवऱ्याची अवस्था पाहून तो उठण्याच्या मनस्थितीत नाही असे वाटते. बायकोचा राग पाहून तिला पतीवर खूप राग आला होता हे स्पष्ट झाले. पती शांत राहिला आणि प्रतिसाद देत नाही, तर पत्नीचा राग वाढल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. हे दृश्य अतिशय नाट्यमय आणि थरारक वळण घेते, जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पती पत्नीचा हा धक्कादायक व्हिडिओ @dramebaazchhori99 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘यामुळेच मला लग्न करण्याची भीती वाटते’ असे लिहिले आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण पुरुषवर्गात भीतीचे वातावरण आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या देवी नक्की कुठून आल्या आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.