भयानक! जंगली मधमाशांनी केला सिंहावर हल्ला, संपूर्ण शरीराला चिपकून राहिल्या अन्.. अवस्था पाहूनच थरकाप उडेल; Video Viral
वन्य प्राण्यांशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्ये अनेकांना धडकी भरवतील. वन्य प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित अनेकी तथ्ये मानवापासून वंचित आहेत ज्यामुळे जेव्हाही त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतात ती लोकांना अचंबित करून सोडतात. सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो, त्याच्या अपार शक्तीच्या जोरावर तो संपूर्ण जंगलावर राज्य करतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील दृश्ये फार वेगळी आणि थरारक आहेत ज्यांना पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. सिंहाची ही अवस्था तुम्हाला अस्वस्थ करेल. नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या सिंहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात सिंहाच्या अंगावर मधमाशांचे संपूर्ण पोळे ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. हे दृश्य पाहून क्वचितच कोणाचा विश्वास बसेल की जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या सिंहाला इतक्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. सिंहाची इच्छा असूनही मधमाशांपासून त्याला स्वत:ला वाचवता आले नाही. तो वेदनेने इकडे-तिकडे जंगलात भटकत राहतो आणि त्याच्या सर्व अंगावर मधमाश्या चिपकून राहतात. मधमाशा या आकाराने लहान असल्या तरी त्यांचा एक डंक इतका जीवघेणा असतो की यामुळे माणसाचे संपून शरीर सुजते. अशात त्यांचे संपूर्ण पोळेच राजाच्या अंगावर बसल्यावर त्याचे काय हाल झाले असावे याचा विचार करा.
दरम्यान सिंहाची ही अवस्था दिसल्यावर माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टीमने औषधे आणि इंजेक्शनच्या मदतीने सिंहाच्या शरीरातील मधमाशा स्वच्छ केल्या. सिंहाला वेदना होत होत्या आणि त्याची अवस्था पाहता त्याला खूप त्रास झाला होता हे स्पष्ट होते. रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन सिंहाला वाचवले. यानंतर सिंहाला नवीन जीवन मिळाले आणि तो पुन्हा जंगलात आपले शाही जीवन जगण्यास तयार झाला. मानव आणि प्राणी या दोघांनाही कशी मदत केली जाऊ शकते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्य केले जाऊ शकते हे ही संपूर्ण घटना दर्शवते.
हा व्हायरल व्हिडिओ @anil.beniwal29 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. लोक यातील दृश्ये पाहून थक्क झाले आहेत आणि सिंहासाठी हळहळ व्यक्त करत आहेत तसेच काहीजण रेस्क्यु तुमचेही कौतुक करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.