Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

Cow Garba Video : ए हालो...! गूपचूप आली अन् क्षणाचाही विलंब न करता गाईने अनोख्या अंदाजात खेळला गरबा, पाहून लोकही झाली खूश. या आगळ्यावेगळ्या गरब्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धूमाकूळ घालतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2025 | 12:07 PM
वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी...! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी...! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचा उत्साह सर्वत्र असा पसरला आहे की त्याला काही तोडचं नाही. दुर्गा मातेला समर्पित असलेल्या या सणात सर्व लोक एकत्र येऊन मातेला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळतात. नवीन कपडे, गाणी, लोकांची गर्दी आणि त्या गर्दीत रंगलेला तो डान्स सर्वांचेच मन प्रफुल्लीत करुन जातो. हेच कारण आहे की, देशभरात गरबा फार उत्साहात आणि आवडीने खेळला जातो. गरब्याचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच नुकताच इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओची खासियत म्हणजे गरबा खेळण्यासाठी यात एका गाईने वाईल्ड कार्ड एंट्री घेतल्याचे यात दिसून येते. आता गाईच्या एंट्रीने तिथे काय काय धूमाकूळ उडाला ते चला जाणून घेऊया.

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिले आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक गाय गरब्याच्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. कुणाचंही लक्ष नसताना गाय रिंगणात एंट्री घेते आणि सेकंदाचाही विचार न करता सर्वांभोवती गोल गोल फिरु लागते. तिच्या या धमाकेदार एंट्रीने सर्वत्र एकच धुमाकूळ माजतो आणि लोक गरबा सोडून गाईपासून आपला जीव वाचवू लागतात. मुख्य म्हणजे, गाय गरब्याप्रमाणे फक्त त्या रिंगणातच गोल गोल फिरते जे पाहून तीलाही गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही असे वाटते. व्हिडिओमध्ये लोक घाबरली असली तरी काहीजण या प्रंसगाचाही आनंद लुटत तिच्या पुढे मजा घेऊन पळताना दिसून येतात. हे संपूर्णच दृश्य गरब्याची एक अनोखी मजा दाखवून देते, जिथे आनंद, उत्साह आणि भीती एकत्रितपणे नाचत असते.

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ @sanskar_singhsarva नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हल्ला १००%, नुकसान ०%, आनंद २००%” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज मी खरोखरच देवी लक्ष्मी पाहिली, जय माता राणी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचा सर्वात सुंदर गरबा, जय धरती माँ जय गौ माता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wild card entry of a cow at garba night amazed everyone video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • cow news
  • Navratri 2025
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral
1

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
2

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व
3

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?
4

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.