(फोटो सौजन्य: X)
अनोख्या आणि थक्क करणाऱ्या व्हिडिओजने सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म तुटुंब भरलेले आहे. इथे नेहमीच अनेक रंजक व्हिडिओज शेअर केले जातात जे आपल्याला आश्चर्यचकीत करतील आणि आताही असाच काहीसा प्रकार इथे जोरदार व्हायरल झाला आहे. नुकताच सोशल मिडियावर जंगलातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात एक माकड आणि मनुष्य एकमेकांविरुद्ध कुस्ती लढताना दिसून आले. कुस्तीच रिंगण सज्ज झालं आणि इथे एक अनोखा खेळ सुरु झाला. खेड्यापाड्यात कुस्ती हा खेळ फार आवडीने खेळला जातो पण जंगलात रंगलेल्या या खेळात शेवटी बाजी कुणी मारली ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये एक माणूस उत्साहाने माकडांना आव्हान देताना दिसून येतो. असंख्य माकडं कुस्तीच्या रिंगणात उभे असतात पण माणसाची धमाकेदार एंट्री पाहून ते घाबरतात आणि लगेचेच कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडतात. पण यातही एक माकड मात्र माणवाला आव्हान देण्यासाठी त्या रिंगणातच बसून राहतो. माणूस आणि माकड दोघेही आमने-सामने येतात. दोघेही रिंगणात एकमेकांना घाबरवून पळवून लावण्याचा प्रयत्न करतात परंतु व्हिडिओच्या शेवटी दोघेही रिंगणाबाहेर दिसू लागतात. माकडचाळे करत मानव माकडाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तितक्यातच माकड घाबरून तिकडून पळून जातो. हे दृश्य इतके मजेदार आहे की ते एखाद्या बॉलिवूड कॉमेडीसारखे वाटते. याला आपण “जंगल कॉमेडी ड्रामा” असे नाव देऊ शकतो.
जब इंसान और बंदर में फर्क ही ना रहे🤔 तो असली कॉमेडी शुरू होती है😂
आपने कभी करी है ऐसी हरकत? pic.twitter.com/TU5ETZiB0R — Dashrath Dhangar (@DashrathDhange4) September 29, 2025
अनोख्या कुस्तीचा हा व्हिडिओ @DashrathDhange4 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा माणूस आणि माकड यात काहीच फरक नसतो. मग खरा विनोद सुरू होतो. तुम्ही कधी असे काही केले आहे का?’. व्हिडिओला आतापर्यंत 50.3 हजार व्युज मिळाले असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हो, या जगात असे बरेच लोक आहेत जे हे करतात पण आपण ते करू नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यामुळे माकडांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हाहा, मग हसणे थांबवणे अशक्य होईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.