विमानात चढण्यापूर्वी महिलेने ओलांडली मर्यादा; श्वानाला चक्क शौचालयात बुडवून मारलं; धक्कादायक घटनेचा Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. सध्या मात्र इथे भयानक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील महिलेची क्रूरता पाहून तुम्हाला तुमचा राग अनावर होईल. मानव हा एकाअसा प्राणी आहे, जो स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला मागे पुढे बघत नाही. याचे अनेक दाखले आजवर सोशल मीडियावर मिळाले आहेत. सध्याही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिलेने चक्क एका श्वानाला शौचालयात मारल्याची घटना घडून आली आहे. या घटनेने आता सर्वांनाच आशचर्याचा धक्का बसला असून याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. घटनेत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
अमेरिकेतून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, ज्यात 57 वर्षांच्या एका महिलेने विमानतळावरील शौचालयात स्वतःच्याच श्वानाला बुडवून मारल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, विमानात श्वानाला आणण्याची परवानगी नसल्याचे महिलेने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली होती, जिथे सुरक्षा तपासणीपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांना शौचालयात मृत कुत्रा आढळला.
आरोपी महिलेचे नाव अॅलिसन अगाथा लॉरेन्स असे आहे, ती विमानात चढण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिच्याकडे तिच्या शवनासाठीची आवश्यक कागदपत्रे नव्हती अशात तिने श्वानाला शौचालयात बुडवून मारण्याचा निर्णय घेतला. त्याचे अवशेष कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे अटक वॉरंट जारी केला. लॉरेन्सला प्राण्यांवरील अत्याचाराच्या तिसऱ्या-पदवीच्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. यानंतर 5,000 डॉलर्सच्या जामिनावर ती बाहेर देखील आली.
NEW UPDATE on the woman accused of drowning dog in Orlando International Airport bathroom before boarding flight
Alison Agatha Lawrence was reportedly trying to board a flight but didn’t have the right paperwork to allow the dog to board and couldn’t take it
She is charged… pic.twitter.com/jPITIKwWqY
— Unlimited L’s (@unlimited_ls) March 20, 2025
सध्या मात्र सोशल मीडियावर ही घटना जोरदार @unlimited_ls धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या धक्कादायक घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तिने एका कुत्र्याला बुडवून मारले कारण ती विमानात चढू शकत नव्हती? प्रक्रिया करण्यापूर्वी तिला 72 तासांच्या मानसिक होल्डवर ठेवायला हवे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला वाईट शिक्षा मिळायला हवी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.