चक्क बेडकाचा केला नेकलेस (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या वेड्यासारख्या गोष्टी करताना दिसतात. काही जण विचित्र पद्धतीने लग्न करताना दिसतात, तर काही जण ४ गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसतात. हे सगळं नाटक फक्त व्हायरल होण्यासाठी आहे. काही जण तर कोणत्याही थराला जातात कारण त्यांना फक्त व्हायरल व्हायचं आहे. पण काही जण इतका किळसवाणा प्रकार करतात की ते पाहवतही नाही. पण तरीही तो प्रकार इतका भयानक असतो की अशा व्यक्ती व्हायरल मात्र नक्कीच होतात.
आता आज आम्ही तुम्हाला या लेखातून जो व्हिडिओ दाखवत आहोत तोच पहा ना. एका महिलेने तिच्या गळ्यात नेकलेस कसा घातला आहे आणि डोक्यावर मांगटीकादेखील तिने घातली आहे आणि तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे तर अहो नीट बघा तरी…
बेडूक गळ्यात आणि डोक्यावर
या बाईने चक्क मोठा बेडूक आपल्या गळ्यात घातला आहे आणि तिने त्याचे दोन्ही पाय असे ठेवलेत की चक्क नेकलेस वाटावा आणि हे कमी होतं की काय म्हणून तिने मांगटिका म्हणून दुसरा बेडूक चक्क डोक्यावर ठेवला आहे. बरं इतकं करून ही बाई थांबली नाहीये तर तिने चक्क Nighty घालून या दोन्ही बेडकांना गळ्यात आणि डोक्यावर बसवून डान्सही केलाय. काही जणांना हे विचित्र वाटत आहे तर काही जण तिच्या हिमतीची दाद देत आहे. तर काहीना हा प्रकार फारच घाण आणि किळसवाणा वाटत आहे.
समस्त बेडूक जमात घाबरलेली
काहींनी तर तिच्या या व्हिडिओवर म्हटलंय की या तिच्या वागण्यामुळे समस्त बेडूक जमात घाबरलेली दिसून येत आहे. आता बेडकांनी नक्की जायचं तरी कुठे? बेडकांना पकडून जर त्यांचे असे हाल होणार असतील तर नक्की काय करायचं त्यांनी तरी? बरं हे बेडूक बाईच्या अंगावरून जराही हलताना दिसत नाहीयेत.गळ्यात नेकलेस घालताना या बाईने त्या बेडकाला उलटे लटकवले असून त्याचे पाय गळ्याभोवती घेतले आहे. दिसायलाही हे अत्यंत घाण आणि किळसवाणे दिसत आहे.
डोक्यावरच्या बेडकाची अवस्था
या बाईने डोक्यावरही तसाच एक बेडूक ठेवलेला दिसून येत आहे आणि यो दोघांनाही घेऊन ती नाचताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिच्या चेहऱ्यावर हावभावही भीतीचे नाहीत तर मजेत नाचतानाचे आहेत. त्यामुळे ही बाई बेडकाला नाही तर बेडूकच बाईला घाबरले असतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आता शोभतीये तात्या विंचूची बायको! Labubu बनली भारतीय नारी, घातली लाल साडी; Video Viral
व्हायरलसाठी काहीही
सध्या अनेक जण व्हायरल होण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसून येत आहेत. अगदी डोंगराच्या कडाशी जाऊन फोटो काढणं असो, कारचे थरार असोत वा कुठेतरी भयानक ठिकाणी जाऊन लग्न करणं असो. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक जण रिल्स आणि व्हायरलपाठी वेडे झालेले दिसून येत आहे. पण तुम्ही आपल्या जीवाची पर्वा नक्की करा आणि तूर्तास हा मजेशीर व्हिडिओ पहा आणि आम्हाला सांगा तुमचं मत यावर काय आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.