किळसवाणं कृत्य! चक्क ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशाने केली लघवी; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये ट्रेनमधील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी टीसीसोबतच्या भांडणांचे, कधी सीटवरुन झालेल्या भांडणांचे शिवाय, ट्रेनला लटकून स्टंट करणाऱ्यांचे, चोरीचे अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. अनेक वेळा काही लोक असे धक्कादायक गोष्टी करतात की पाहून राग अनावर होतो.
सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील एक किळसवाण्या कृत्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने अतिशय किळसवाणं आणि धक्कादायक कृत्य केले आहे. या माणसाने हद्द पार केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये एका पुरुष ट्रेनच्या खिडकीतून लघवी करत आहे. या घटनेने ट्रेनमधील इतर प्रवाशांना धक्का बसलाच आहे, परंतु यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागला आहे. परंतु तरीही हा व्यक्ती निर्लजासारखे हे धक्कादायक कृत्य करत आहे.या व्यक्तीला कसलीही लाज वाटली नाही, त्याने थेट खिडकीतून लघवी केली आहे. हा व्यक्ती दारुच्या नशेत होता असे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ दिल्ली ते शामली मार्गावर ट्रेनचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @anuj_bansa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
एका युजरने “अशा दारुड्या लोकांना ट्रेनमध्ये चढूच दिले नाही पाहिजे” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “यासाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्याची गरज असल्याचे” म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने “शिक्षण गरजेचे आहे” असे म्हटले आहे. अनेकांनी या व्यक्तीला पकडून चोप दिला पाहिजे असेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.