अबब! डोक्यावर काचेचे ग्लास त्यावर सिलिंडर अन् वर पाण्याची टाकी... महिलेचा खतरनाक स्टंट पाहून आवाक् व्हाल; Video Viral
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अनेकदा नको ते प्रकार करू पाहतात. सध्याच्या या काळात सोशल मीडियाचे वेड इतके वाढले आहे, लोक इथे आपली प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट शेअर करू पाहतात. व्हायरल होण्याच्या नादात लोक बरेच धोकादायक प्रकारही करतात. सध्या असाच अजब-गजब प्रकार इथे व्हायरल झाला आहे ज्यातील महिलेचा स्टंट आता अनेकांचे श्वास रोखून धरत आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
धक्कादायक! महिलेने 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर ढकलले, काळजात धस्स करून जाईल हा Viral Video
काय आहे व्हिडिओत?
सिलिंडर उचलणे हे अत्यंत अवघड काम आहे. भरलेले सिलेंडर तर सोडाच, लोकांना खूप प्रयत्नांनंतर रिकामे सिलिंडर देखील उचलता येत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातील महिलेचा पराक्रम तुमच्या काळजाचा ठोकाच चुकवेल. सोशल मीडियावर डान्सचे, जुगाडांचे आणि स्टंट्सचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात मात्र सध्या इथे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात एक महिला चक्क डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर ग्लास त्यावर सिलेंडर आणि मग त्यावर पाण्याची टाकी घेऊन नाचताना दिसून आली.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात महिला आपल्या घरात नाचताना दिसून आली. मात्र हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा ती आपल्या डोक्यावर ग्लास, सिलेंडर आणि पाण्याची टाकी घेऊन नाचताना दिसली. हा सर्व प्रकार पाहून लोक आवाक् झाले. व्हिडिओतील हे दृश्य फार धक्कादायक असून असे स्टंट्स आपल्या जीवावर देखील बेतू शकतात. सोशल मीडिया युजर्स मात्र आता महिलेच्या बॅलेंसिंगची भरभरून प्रशंसा करत आहेत, तसेच हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील केला जात आहे.
भयानक! सायकलसह तरुणीला ‘अदृश्य शक्तीने’ ओढले, दृश्य पाहून सर्वांचेच उडाले होश; धडकी भरवणारा Video V
महिलेचा हा स्टंट व्हिडिओ @_neetu_5650 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर इतका ट्रेंड करत आहे की त्याला आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे. लोक व्हिडिओला चांगलेच शेअर करत असून अनेकजण यावर कमेंट्स करत महिलेच्या स्टंट्सवर आपले मत व्यक्त करत आहे. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा आई म्हणते आणून माझ्या डोक्यावर ठेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ग्लास जराही सरकला ना तर कोणीही वाचवू शकणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.