(फोटो सौजन्य:Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्या इथे एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवतील. तुम्ही आजवर इंटरनेटवर अनेक विचित्र गोष्टी पहिल्या असतील मात्र आताचा हा व्हिडिओ तुमच्या कल्पनेपकीडचा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये तरुणीसोबत असा काही प्रकार घडून येतो की पाहून सर्वच थक्क होतात. आता यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडले?
सध्या सोशल मीडियावर एक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला रात्रीच्या सुमारास रस्त्यावरचे काही दृश्य दिसून येतील. तुम्ही यात पाहू शकता की, एक मुलगी सायकल चालवत असते, याचवेळी अचानक एक अदृश्य शक्तीने तिला पुढे ओढते आणि तिची सायकल हवेत खेचली जाते. घटनेतील हे दृश्य अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. सायकल आणि मुलगी दोघेही हवेत खेचले जातात आणि दुसऱ्या बाजूला येऊन आढळतात. ही घटना ब्राझीलमध्ये घडली असून ती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. काही लोक याला अलौकिक घटना मानत आहेत, तर काही लोक म्हणतात की ही एक प्रकारची केबल संबंधित घटना असू शकते. इंटरनेटवर आता या घटनेची बरीच चर्चा रंगत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की ही अलौकिक घटना असू शकते, परंतु बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की मुलगी आणि सायकल काही केबलमध्ये अडकली होती आणि ती केबल ओढताच मुलगी आणि सायकल दोघांनी हवेत उडाली असावी. मात्र यामागचे सत्य अजून गुलदस्त्यातच आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @mrlistparanormal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ब्राझीलमध्ये अदृश्य शक्तीने महिलेची बाईक हवेत फेकली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “दुचाकी आणि वाहनाभोवती एक केबल गुंडाळली गेली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओमध्ये दुसऱ्या कोणी भूत पाहिला का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.