(फोटो सौजन्य:X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक धक्कादायक आणि थक्क करणारे प्रकार व्हायरल होत असतात. यातील दृश्ये नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडची ठरतात. नुकताच इथे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये लोकांना आवाक् करत आहेत. यात रेल्वे स्टेशनवरील भयाण प्रकार दिसून आला ज्यात एका महिलेने चक्क एका 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर ढकलून दिले. चिमुकलीला काही समजेल तितक्यातच ती रेल्वे रुळावर पडते. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, यात दिसत आहे की एक चिमुकली तिच्या आईसोबत रेल्वे स्टेशनवर उभी होती. याचवेळी त्यांचा मागे बाकड्यावर एक बेघर महिला बसलेली असते. यानंतर कोणाला काही समजेल तितक्यातच ती महिला उठते आणि अचानक समोर उभ्या असलेल्या चिमुकलीला जोरदार धक्का देते, यानंतर ती चिमुकली रेल्वे रुळावर पडते. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसतो मात्र ट्रेन येण्याआधीच लोक मुलीला रुळावरून बाहेर काढतात. लोक घाबरले होते, मात्र कोणीतरी हिंमत दाखवून मुलीला वाचवले हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना 2023 मध्ये घडली होती आणि ती सीसीटीव्हीत कैद झाली होती. याचा व्हिडिओ मात्र आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
माहितीनुसार, बेघर महिलेला अटक करून शिक्षा सुनावण्यात आली. तिला मनोरुग्णालयात 10 वर्षांची शिक्षाही करण्यात आली आहे. चिमुकली या घटनेत जखमी झाली, पण ती बरी झाली. लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि समाजात बेघर लोक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे यावर चर्चा करत आहेत.
OMG! A homeless woman in the U.S. pushes a 3-year-old girl onto the train tracks (2023) pic.twitter.com/dP0qmMQlxk
— Yelisaveta Petrov (@YelisavetaPaUSA) March 17, 2025
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @YelisavetaPaUSA नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अरे देवा! अमेरिकेत एका बेघर महिलेने 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळांवर ढकलले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अनेक बेघर लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे देवा, हे खूप वाईट आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.