जीव गेला तरी चालेल पण रील बनली पाहिजे! महिला चक्क रेल्वे रुळावर जाऊन झोपली, अंगावरून ट्रेन जाताच... थरारक Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात तर कधी भन्नाट जुगाड. लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक अजब-गजब प्रकार करू पाहतात. बऱ्याचदा लोक आपला जीव धोक्यात घालून नको ते प्रकार करू पाहतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिला रीलसाठी अक्षरशः रेल्वे रुळावर झोपल्याचे दिसून आले. एवढेच काय तर यावेळी एक ट्रेनदेखील तिच्या अंगावरून जाते, जे पाहणे फार थरारक ठरते. व्हिडिओत पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
शुल्लक प्रशिशीसाठी अनेक लोक सोशल मीडियावर आपला जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करू पाहतात. हे असे करणे फार धोकादायक ठरू शकते, यामध्ये त्यांचा जीव जाण्याचीही शक्यता असते मात्र तरीही कसलाही विचार न करता लोक हे स्टंट करतात आणि मग अपघातास बळी पडतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओतील दृश्ये इतकी थरारक आहेत की ती पाहून तुम्हाला कपाळाला हात माराल.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला रेल्वे रुळावर रील बनवण्याचा प्रयत्न करत असतात. रीलसाठी महिला चक्क: रेल्वे रुळावर जाऊन झोपते. हातात फोन घेऊन ती रेल्वे रुळामध्ये व्हिडीओ काढण्यासाठी हा स्टंट करताना दिसते. पटरीच्या मधोमध झोपून ती हा व्हिडीओ काढत असते. तेवढ्यात एक भरधाव वेगात एक ट्रेन येते आणि या ट्रेनचा संपूर्ण व्हिडीओ ती आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करते. यानंतर महिलेचे काय झाले आणि हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत व्हिडिओत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
स्टंटबाजीचा हा व्हायरल व्हिडिओ @rupaligaikwad609 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फोन ठेवून ती बाजूला निघाली”
तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्किप करून एडिट केलंय तिने” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निव्वळ मूर्खपणा आहे हा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.