(फोटो सौजन्य – Instagram)
सामान्यांना सेलिब्रिटींचे भारी आकर्षण वाटत असते. अनेकदा आपल्या आवडत्या सेलेब्रिटींचा कोणता चित्रपट रिलीज झाला की चाहते त्यातील अनेक गोष्टी आपल्या फॉलो करू पाहतात. सेलिब्रिटींचे आयुष्य कसे असते याबाबत जाणून घेण्यास लोकांना फार उत्सुकता वाटत असते. अशात एका तरुणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने धुमाकूळ घालत आहे. यात तो सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये नक्की काय विशेष मिळतं हे पाहायला गेला. ऐकायला थोडे अजब वाटेल मात्र व्हिडिओत पुढे ज्या ज्या बाहेर पडल्या त्या पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ तुमचे चांगलेच मनोरंजन करेल. यात तरुणाला नक्की कोणकोणत्या गोष्टी सापडल्या ते जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओमधये तरुणाने सचिन तेंडुंलकर, सलमान खान, अजय देवगण, श्रद्धा कपूर, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींच्या डस्टबिनची झडती घेतली. कचऱ्यामध्ये फेकलेल्या गोष्टी इतक्या अजब आहेत की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल की यात तरुणाला अनेक अनोख्या आणि चकित करणाऱ्या गोष्टी दिसल्या. कुणाच्या कचऱ्याच्या पेटीत रिकाम्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या तर कुणाच्या कचरापेटीत विमल पान मसाला आढळून आला. कुणाच्या डस्टबिनमध्ये एअरपॉड आढळून आले तर एकाच्या कचरापेटीत तर चित्रपटाची स्क्रिप्ट फेकलेली आढळून आली. हे सर्वच दृश्य पाहणे फार मजेदार ठरले. लोक यातील दृश्ये पाहून आता आश्चर्यचकित झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. यातील दृश्ये अनेकांसाठी रोमांचक होते, युजर्सने तर या व्हिडिओची इतकी मजा लुटली की व्हिडिओला 6 मिलियनहुन व्युज मिळाले.
हा मजेदार व्हिडिओ @sarthaksachdevva नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भारत नवशिक्यांसाठी नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे” अंबानींच्या घरातील कचरा चेक कर” तर दुसऱ्या युजरने लिहले आहे, “बेरोजगारी शिगेला पोहचली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.