ताईंनी Operation Sindoor जास्तच मनावर घेतलंय, अख्ख डोकं सिंदुराने भरलं अन् दृश्य पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात; Video Viral
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केलं, ज्याद्वारे पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. याद्वारे आता भारत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कबरी खोदत आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. दरम्यान या हल्लयाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर समोर व्हायरल झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. या व्हिडिओजमध्ये हल्ल्यादरम्यानचे अनेक भीषण दृश्ये दाखवण्यात आली मात्र त्यातच आता यासंबंधितला एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. यात एका महिलेनेतिच्या संपूर्ण कपाळावर सिंदूर लावल्याचे दिसून आले आणि तेही तिने अशा अनोखा पद्धतीत लावले होते की ते पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले तर काहींनी याला ऑपरेशन सिंदूरसोबत जोडून यावर मिश्किल प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा फडशा पाडत आहे. दरम्यान, हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. भारतातील लोकांचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारतीयांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही आमच्या २६ नागरिकांच्या मृत्युचा बदला घेतला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला तिच्या संपूर्ण कपाळावर सिंदूर लावताना दिसून आली.
व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या संपूर्ण कपाळावर सिंदूर लावताना आणि केस विंचरताना दिसत आहे. यासोबतच, ती एका भोजपुरी गाण्यावर लिप-सिंक करत रील बनवत असल्याचे समजते. साधारणपणे भारतात, हिंदू परंपरेनुसार, स्त्रिया त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी केसांच्या भांगेत सिंदूर लावतात. पण या महिलेने ज्या पद्धतीने तिच्या संपूर्ण कपाळावर सिंदूर लावला ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की, महिलेने एक हेअर स्टाईल केली असून यात तिने जवळजवळ आपल्या संपूर्ण कपाळावर सिंदूर भरले आहे. ताईंचे सिंदूर प्रेम पाहून सर्वच थक्क झाले आणि व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याला @chahat_yadav_official1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो लोकांच्या व्युज मिळाल्या असून लोक अजूनही याला शेअर करत आहेत. अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये महिलेच्या सिंदूर प्रेमावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सिंदूर मिशन यशस्वी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दीदी, हे सिंदूर आहे, निदान त्याची थट्टा तरी करू नकोस”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.