Women dancing on buffalo's back for reel video goes viral
Women dancing on Buffalo : सध्या सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. रिलसाठी कोणीही काहीही विचित्र स्टंट करत आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. कोणी रिलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहे, तर कोणी इतरांचा. मनोरंजनाच्या नावाखाली विचित्र कंटेट क्रिएट केला जात आहे. आता हेच बघाना एक महिला रिलसाठी चक्क एका म्हशीच्या पाठीवर उभी राहून डान्स करत आहे. तिच्या कुटुंबातील लोक देखील तिच्यासोबत नाचत आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याच्या एक दिवसापूर्वी एका तरुणीने रिलसाठी एका बेडकाला गळ्यात चैन सारखे घातले होते. तर एका महिलेने बेडकाला मांगटिका बनवले होते, गळ्यात घातले होते आणि डान्स करत होती. हे सगळं केवळ कशासाठी तर सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी केले जात आहे. याशिवाय काही लोक धोकादायक स्टंट करत आहे. यामध्ये बाईक स्टंट, धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचे धाडस, धावत्या रेल्वेसोबत फोटो काढणे तर कोणी डोंगराच्या काठावर असलेल्या झाडावर चढून डान्स रिल बनवत आहे. अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला म्हशीच्या पाठीवर उभी राहून उड्या मारत मारत डान्स करत आहे. ही महिला भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. तर घरातील सदस्य उभे राहून बघत आहेत. परंतु केवळ एका रिलसाठी एखाद्या प्राण्याला त्रास देणे कितपत योग्य आहे. यामुळे त्या महिलेला देखील गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. जर म्हैस अचानक उधळली तर महिला धाडकन खाली आदळेल. यामुळे तिला गंभीर दुखापत होऊ शकते.
गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video Viral
खुद को फेमस करने के चक्कर में किसी को कष्ट मत दो 🙂😢 pic.twitter.com/ulHaE0Ib7c
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) August 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने “म्हशीची पाठ तुटेल ताई”, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने “रिल का चक्कर बाबु भैया” असे म्हटले आहे. आणखी एकाने “स्वत:ला फेमस करण्यासाठी त्या मुख्या जनावराल त्रास देतायत” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.