जन्माची अद्दल घडली! धावत्या ट्रेनला लटकून हिरोगिरी काकांना पडली महागात; खांबाला धडकले अन्..., video viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये स्टंटचे तर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही लोकांच्या अंगात उगाच हिरोगिरीची खाज असते. कोणतेही कारण नसताना हिरोबाजी लोक करत असतात. पँण अनेकदा ही हिरोबाजी लोकांच्या चांगलीच अंगलट येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक काका धावत्या ट्रेनला लटकून हिरोगिरी करत आहेत. पण त्यांच्यासोबत असे काही घडले आहे की, पुन्हा जन्मात कधीही हिरोगिरीचा विचारही करणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वेगाने धावत आहेत. या ट्रेनमध्ये अनेक लोक दरवाज्याजवळ उभे राहिले आहेत. काही लोक ट्रेनच्या बाहेर डोके काढून उभे आहेत. याच वेळी एक काका शर्ट काढून शाहरुख स्टाईलमध्ये पोझ देऊन उभे आहे. काका मस्त हवा खात आहेत. ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत आहे. याच वेळी काका ऐका विजेच्या खांबाला धडकतात. विजेच्या खांबाला ते इतके जोरात धडकतात की पाहून अंगावर काटा येईल. व्हिडिओ पाहून लक्षात येते की, नक्कीच त्यांना जोरात फटका बसला असणार आहे. काकांच्या हाताला आणि तोंडाला मारा बसला असणार आहे.
अलीकडे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक सोशल मीडियासाठी देखील अशा प्रकारची धोकादायक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यामुळे लोकांना लाईक्स आणि व्ह्यूज तर मिळत आहेत, मात्र यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. असे होऊनही लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. अशा प्रकारची धोकादायक हिरोगिरी करत राहतात.
अखेर नागिणीने शिकार केलीच! तरुणीचा अतरंगी कारनामा; जिंवत बेडकाला बनवले गळ्यातील नेकलेस, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
Kaisi laparvahi Karte Hain Log pic.twitter.com/PnvmEw4NlN
— Prabha Rawat 🕉️🇮🇳 (@Rawat_1199) August 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत, काकांना चांगलेच लागले असणार असे म्हटले आहे. एका युजरने कोणी सांगितले होते या वयात हिरोगिरी करायला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने काकांची हवा फूस झाली असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
क्षणात डाव पलटला! सिंहांनी मगरीला चारीबाजूंनी घेरलं पण… ; शेवटी घडलं ते अनपेक्षित, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.