Young boys semiclassical dance on Garaj-Garaj Video goes viral
Semiclassical Dance Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसे पाहायला गेले तर अलीकडे सोशल मीडिया हे लोकांसाठी त्यांचे कला कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ बनले आहे. यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या कलागुणांना जगासमोर सादर करतो. यामध्ये तुम्ही भरतनाट्यम, कथक यांसारखे पारंपारिक शास्त्रीय नृत्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. नृत्य केवळ मुलीच नाही तर मुले देखील अप्रतिपणे सादर करतात.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी अत्यंत अप्रतिम पद्धतीने गरज-गरज गाण्यावर सेमी-क्लासिकल नृत्य सादर केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणांनी अतिशय उत्तमपणे नृत्य शादर केले आहे. दोघांनी पांढरे धोतर आणि शर्ट परिधान करुन छान असा लुक तायर केला आहे. नृत्य सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरही एक्सप्रेशन्स देखील अप्रतिम आहेत. तसेच त्यांच्या स्टेप्सदेखील एकदम स्पष्ट आहेत. हा व्हिडिओ सतत पाहावासा वाटत आहे. त्यावरुन नजर हटवणे देखील कठीण आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @appu______2000 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी तरुणांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने अद्भुत कलाकार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने शास्त्री आणि आधुनिक संगीताचा ताळमेळ छान आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने पुरुष शास्त्रीय नृत्य सादर करतात हे सर्वात सुंदर आहे, तर आणखी एकाने मी इंटरनेटवर आज पाहिलेली सर्वात छान रिल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.