young girl desi jugad uses table fan for drying hair funny video goes viral
Desi Jugad Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, भांडण, डान्स रिल्स, जुगाड यांसारख्या प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यामध्ये जुगाडाचे अनेक भन्नाट भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. जुगाड करणाऱ्यात भारतीय तर सर्वात पुढे आहे. आता आपल्या घरातच पाहा ना आपली आई छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील जुगाड करत असते.
जुगाड करणाऱ्यांच्या मते यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. सध्या असाच एक मजेशीर जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर न मिळाल्याने एक भन्नाट जुगाड केला आहे. यामध्ये तरुणीने एक टेबल फॅन घेऊन तिचे केस सुकवले आहेत. विशेष म्हणडे एवढा जड टेबल फॅन ती एका हाताने उचलत आहे. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांनी याची मज्जा घेतली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे.
जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
when you don’t have a hair dryer pic.twitter.com/W9SyS9X1xs — Kang rekom (@kangrekom) October 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @kangrekom या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने हा जुगाड भारताबाहेर नाही गेला पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अरे फॅन ऑन करुन त्याच्यासमोर बस ना ताई असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हेअर ड्रायर अल्टा प्रो मॅक्स आहे असे म्हटले आहे. अशा मजेशीर प्रतिक्रिा लोकांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.