Young girl put small frog in neckless chain video goes viral
सध्या सोशल मीडियावर अनेक अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळत आहे. अलीकडे लोक प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी काहीही गोष्टी करत आहे. कोणी यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहे, तर कोणी दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. कोणी भलताचं, कोणत्याही कामी न येणारा जुगाड करत आहे. आता अलीकडे एक वेगळाच ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कोणी बेडकाला, तर कोणी पालीला पकडून गळ्यातले दागिने बनवत आहे. विशेष करुन महिला जिंवत प्राणी पकडून त्यांना गळ्याभोवती गुंडाळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने जिंवत बेडकाला पेंडेंट बनवले आणि त्याची चैन करु गळ्यात घातले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने बेडकाच्या एका पायाला दोरा बांधला आहे. तिने बेडकाच्या पायाला दोरा बांधून तो गळ्यात घातला आहे. तुम्ही पाहू शकता की बेडूक उड्या मारताना दिसत आहे. कदाचित तो स्वत:ची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असले. ही तरुणी एक व्लॉग बनवत आहे. बेडूक उड्या मरत आहे, मात्र तरुणीला याचा कोणताही फरक पडताना दिसत नाही. यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका महिलेने जिंवत बेडकाला गळ्यात घातले होते, तसेच डोक्यावर मांगटिकासारखेही ठेवले होते. असे करत तीने डान्स रिल बनवली होती.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @inspire__.up शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सोशल मीडियासाठी लोक काहीही करायला तयार असतात याचेच उदाहरण हा व्हिडिओ आहे. लोकांना हा व्हिडिओ पाहून काय बोलावे हे देखील सुचत नाही.
यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने, “ताई छान आहे तुमचा मेंढकलेस” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “अजून काय बघायचे बाकी राहिले आहे आता?” असा प्रश्न केला आहे. आणखी एका युजरने “अखेर नागिनीने बेडकाची शिकार केलीच” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
30 सेकंदाची रिल जीवापेक्षा किमती? तरुण धावत्या ट्रेनसमोर गेला अन्….; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.