Young man called the delivery boy to throw away the garbage video goes viral
अलीकडे बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवाचे आयुष्य अगदी सोपे झाले आहे. मानवाला घर बसल्या दुनियेची सैर करायला मिळत आहेत. घर बसल्या कोणत्याही गोष्टी मागवता येत आहेत. कोणला शॉपिंग करायची असले, किंवा कोणते सामान दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या देशात पोहोचवायचे असेल तर सर्व गोष्टी आता सहज आणि सोप्या झाल्या आहेत. अनेक असे ॲप्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपण घरुन शॉपिंग करु शकतो, जेवण मागवू शकतो, आपल्या वस्तू इतर ठिकाणी पाठवू शकतो. परंतु मानव या गोष्टींवर इतका अवलंबून झाला आहे की, अगदी थोड्याशा अंतरावर जाणेही टाळत आहे. एका तरुणाने तर हद्दच पार केला आहे.
या तरुणाने एका खाजगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला अशी गोष्ट डिलिव्हर करण्यासाठी बोलावले आहे, ज्याचा तुम्ही-आम्ही विचारही केला नसले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती एका खाजगी कंपनीतून डिलिव्हरी बॉयला आपले सामान पोहोचवण्यासाठी बोलावतो. डिलिव्हरी बॉय देखील त्याचे काम करण्यासाठी बोलावलेल्या ठिकाणी जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका गल्लीमध्ये डिलिव्हरी बॉय स्कूटी घेऊन गेला आहे. तिथे गेल्यावर त्याच्या हातात एक काळी पिशवी दिली जाते. यावेळ डिलिव्हरी बॉय तरुणाला पिवशीमध्ये काय आहे विचारतो, तेव्हा त्यामध्ये कचरा असल्याचे सांगितले जाते. यावर डिलिव्हरी बॉयला धक्का बसतो. तो कचरा घेऊन जायला. तुम्ही पाहू शकता की, दोघांमध्ये यावरुन वाद सुरु आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “माझ्या घरचा कचरा पण घेऊन जा भाऊ” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “महिन्याचे किती पैसे घेणार” असे विचारले आहे, तिसऱ्या एका युजरने “कसे कसे लोक राहतात या जगात?” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.