(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि अचंबित करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नसतो. इथे फक्त माणसांचेच नाही जंगलातील प्राण्यांचे देखील बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. मुळातच प्राण्यांचे आणि माणसांचे जग हे फार वेगळे असते आणि जेव्हा ते एकमेकांच्या राज्यात पाऊल ठेवतात तेव्हा भयानक घडून येते. असेच काहीसे सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी बिबट्या माणसांच्या वस्तीत एंट्री घेत असल्याचे दिसते. इथे येताच त्याची नजर एका महिलेवर पडते. तिला पाहताच तो तिच्यावर तुटून पडतो आणि शिकारीसाठी तिच्या अंगावर धाव घेतो. बिबट्या महिलेला पकडून तिला तिकडून घेऊन जाणार असतो पण तितक्यात असं काही घडत की संपूर्ण दृश्यच बदलून जाते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका चालू रस्त्यावरील दृश्य दिसून येतात. रस्त्यावर लोकांची ये, जा चालू असते पण त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला पार करून रस्त्यावर बिबट्याची एंट्री होते. यावेळी समोरून एक महिला तिकडून जात असते, बिबट्याला पाहताच ती घाबरते आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळू लागते पण बिबट्याची नजर तिच्यावर पडलेली असते ज्यामुळे वेळ वाया न घालवता तोही तिच्यामागे धावत जातो आणि अवघ्या काही सेकंदातच तिला रस्त्यावर लटवून तिची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. महिला खूप प्रयत्न करते पण तिला बिबट्याने तिच्यावर इतका जोरदार हल्ला केल्याचे असते की काही केल्या तिला यातून आपली सुटका करता येत नाही.
इथपर्यंतचे दृश्य पाहता आता काही महिला बिबट्याच्या तावडीतून बाहेर पडत नाही असेच वाटू लागते पण तितक्यातच रस्त्यावरील एक माणूस महिलेच्या मदतीसाठी धाव घेतो. तो बिबट्याला महिलेपासून दूर करण्यासाठी पुढे जातो आणि तितक्यातच बिबट्याही घाबरून तिकडून पळून जातो. व्यक्तीच्या या धैर्यामुळे महिलेचा जीव वाचतो आणि बिबट्याचा हल्ला अखेर फेल ठरतो. बिबट्याचा हा हल्ला आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता व्यक्तीच्या धैर्याचे मोठे कौतुक करत आहेत.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ @alikhanakreal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हिरो म्हणा किंवा धाडसी माणूस म्हणा, जितकं म्हणाल तितकं कमीच आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शूर माणसाने अनेकांना वाचवले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावाच्या हिमतीला सलाम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.