Young man made oxygen cylinder from condom viral video
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स, खाण्या-पिण्याचे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये जुगाड करणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जुगाड करणाऱ्यांच्या मते यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. अनेकदा काही जुगाड असे असतात की त्याचे कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही, तर काही जुगाड असे असतात की पाहून हसावे की रडावे कळत नाही.
सध्या एका विचित्र जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाने कंडोम पासून ऑक्सिजन सिलेंडर बनवला आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुणाने कंडोमला फुग्यासारखे फुलवले आहे. तसेच त्याला ऑक्सिजन सिंलेडरची पाईप जोडीली आहे. तरुणाने ती पाईप तोंडाला लावली आहे आणि श्वास घेत आहे. तसेच तरुणाने स्वीमिंग पूलमध्ये घातले जाणारे गॉगल्स घातले आहेत. तसेच त्याने एक टॉर्च देखील डोक्यावर लावलेली आहे. त्यानंतर तरुण जोरदार वाहणाऱ्या पाण्यात त्या सिलेंडरसह उतरतो आणि पाण्यात उलटा होतो. तरुण पाण्यात आपले तोंड घालून सिलेंडर काम करत आहे का हे चेक करत आहे बहुतेक. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरण कठीण झाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @eye.india.media या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, अच्छा या वापर लोकसंख्या कमी करण्यासाठी होत नाही बहुतेक असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने अरे टॉर्च का लावलाय पाणी तर खूप घाण आहे असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.