मगरीवर तुटून पडला बिबट्या; जबड्यात धरलं, फरपटत नेलं अन्..., थरारक VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचा खजिना आहे. रोज काही ना काही आपल्याला पाहायला मिळते. स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या राहणीमानासंबंधीत, जीवनशैलीवर आधारित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असे व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये तुम्ही वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या भयानक प्राण्यांचे शिकार करतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अधिक चपळतेने शिकार करतानाचे थरराक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक थरारक दृश्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये एका बिबट्याने मगरीची शिकार केली असून शिकारीचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलाचा परिसर दिसत आहे. येथेच एक बिबट्या एका झाडाच्या फांदीवर उभा आहे. त्याच्या जबड्यात एक भली मोठी मगर दिसत आहे. फांदीवरुन तो मगरीला फरपटत घेभव जात आहे. बिबट्याने मगरीची मान धरली आहे. आपली शिकार घेऊन जाताना बिबट्या दिसत आहे. या थरारक दृश्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यापूर्वी मगरीची शिकार करातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये बिबट्याने पाण्यातच शिरुन मगरीची शिकार केली होती. शिवाय एका जंगल सफारीतील बिबट्या अचानक दोन पायांवर उभे राहिल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @soraia_cozzarin या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने बिबट्याची ताकद अतुलनीय आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने २०० पाऊंड वजनाच्या मगरीला त्याने धरले, अद्भुत आहे हे असे म्हटले आहे. तर काहींनी याचा व्हिडिओ बनवणाऱ्यांना तिथून जाण्यास सांगितले आहे. व्हिडिओ काढणारा व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे, तर यावर एकाने त्याला शांत बसता येत नाही का असे एकाने म्हटले आहे. तसेच तुम्हाला या अकाउंटवर असे अनेक व्हिडिओ देखील पाहायाल मिळतील.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.