दुर्लभ दृश्य! दोन पायांवर माणसांसारखा उभा राहिला बिबट्या ; VIDEO पाहून नेटकरी चकित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांचे देखील तुम्ही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये आपल्याला प्राण्यांचे शिकार करतानाचे, शिकार होतानाचे, त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचे अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा काही असे व्हिडिओ असतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका बिबट्याने असे काही केले आहे की, ज्याची कुणी कल्पना देखील केली नव्हती. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध क्रुगर राष्ट्रीय उद्यानातील आहे. यामध्ये एक बिबट्या माणसांसारखे त्याच्या पायांवर अगदी सरळ ताठ मान करुन उभा आहे. हे दृश्य कुमाना धरणाजवळील सफारीला गेलेल्या मेरी टार्डनेने केले आहे.
या अनोख्या दृश्याने सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकले आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिबट्या इम्पालाची शिकार करत होता. यावेळी अचानक त्याने असे काही पाहिले की बिबट्या माणसांप्रमाणे दोन पायांवर उबा राहिला. त्यानंतर काही वेळांनी आपल्या भक्ष्याच्या शोधात गेला. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, शिकार करत असताना, त्याला शिकार स्पष्टपणे दिसावी यासाठी तो त्याच्या पायांवर उभा राहतो. जेणेकरुन शिकार दिसताच तो त्याच्यावर हल्ला करु शकले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
That leopard is looking at his food by standing on two legs. Leopards are one of the most versatile creatures on earth. From Kruger. pic.twitter.com/tNG74rt9R8 — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ParveenKaswan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष्य वेधले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने “ही शिकारीची टेक्निक आहे” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने “हे दृश्य खरोखरच मनोरंजक आहे” असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने “मी पहिल्यांदाच बिबट्याला असे पाहिले,” असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.