Young man performs push-ups stunt on dangerous bridge for reel video viral
सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन तरुणाईमध्ये धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परंतु तरीही लोक स्टंटबाजी करणे काही बंद करत नाहीत.
नुकतेच एका तरुणाने सोशल मीडियासाठी सिंह शिकार करत असताना त्याच्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सिंहाने मानव जवळ येताना पाहून त्याचा पाठलाग केला. सुदैवाने त्याने तरुणावर हल्ला केला नाही, परंतु हल्ला झाला असता तर तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता.
आता पुन्हा एकदा असाच एक आणखी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हिरोगिरीच्या नादात तरुण धोकादायक पुलावर पुश अप्स करत आहे. भारतातील सर्वात लांब पूलावर म्हणजेच आसाममधील लोहित नदीवर बांधलेल्या पुलावर तरुण पुश अप्स करत आहे हा पूल त्याच्या सुंदर विलोभनीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
परंतु हा तरुण पुलावर लटकून पुश-अप्स करताना दिलत आहे. हा पूरल ९ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे. ही नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. येथे दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे नदीला प्रचंड पुर येतो. अशा वेळी तरुणाला पुलावर पुश-अप्स करताना पाहून अनेजण आश्चर्यचकित झाले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हिरोगिरी नडली! तरुणाच्या ‘त्या’ कृत्यावर भडकला जंगलाचा राजा; पहा नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
What’s happening to our youth?
Risking life and limb for a few likes and views on social media!This shocking stunt by a young boy on the Dr. Bhupen Hazarika Setu (Dhola-Sadiya Bridge)—India’s longest river bridge—is not bravery, it’s sheer recklessness.
cc @assampolice… pic.twitter.com/WaBHMRcEO6
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) August 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. स्थानिक लोकांनी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिकांच्या मते, अशा लोकांवर कडक कारवाई केली तर भविष्यात अशा घटनांना रोखता येईल. अशा प्राणघातक स्टंटमुळे तरुणाचा जीव देखील जाण्याची शक्यत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.