आत्मनिर्भरपणा असावा पण एवढा...! यूट्यूब व्हिडिओ पाहून तरुणाने स्वतःवरच केली शस्त्रक्रिया; पोट कापून 12 टाकेही घातले
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब प्रकार व्हायरल होत असतात. इथे अनेकदा अशा काही घटना व्हायरल होतात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही इथेही अशीच एक घटना जोरदार धुमाकूळ घालत आहे. घटनेतील प्रकार इतका भीषण आहे की, याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसावा. सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर अनेक कामाची माहिती शेअर केली जाते मात्र अनेकजण उचापती लोक असे हे व्हिडिओ पाहून आपल्या खऱ्या आयुष्यात नको ते प्रयोग करू पाहतात.
आता हेच पाहा ना, तरुणाच्या पोटात दुखू लागले म्हणून तरुणाने डॉक्टरकडे न जाता एक जीवघेणी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच स्वतःची शाश्त्रक्रिया केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे घडून आली आहे. माहितीनुसार तरुणाचे वय ३२ वर्षे आहे. त्याने युट्यूब व्हिडिओ पाहून ऑपरेशनची पद्धत शिकली, नंतर इंटरनेटवर भूल देण्याच्या इंजेक्शनबद्दल वाचले. यानंतर, त्याने घरापासून २०० मीटर अंतराचर असलेल्या मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शन, सर्जिकल ब्लेड आणि औषधे आणली.
घरी आल्यानंतर पोटातील दुखणाऱ्या ठिकाणी तरुणाने स्वतःच ब्लेडने ७ सेंमीचा चिरा दिला. मग त्यात हात चालून चेक केले. पण जेव्हा काहीच समजले नाही तेव्हा त्याने सुई आणि धाग्याने ते स्वतः शिवले. पण काही तासांनी त्याची तब्येत बिघडू लागली, म्हणून त्याने हे त्याच्या पुतण्याला सांगितले. पुतण्याने त्याला कम्बाइंड हॉस्पिटलमध्ये नेले. जेव्हा संपूर्ण प्रकरण डॉक्टरांना सांगितले, तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले.’
ती एक चूक… जीवघेणी ठरली! ट्रेनने तरुणाला अक्षरशः 500 मीटरपर्यंत फरफटत नेले, घटनेचा थरारक Video Viral
वृंदावन के रहने वाले इन जनाब को पेट में दर्द हुआ तो यू-ट्यूब पर वीडियो देखा और खुद ही अपने पेट का ऑपरेशन कर लिया।
ऑपरेशन के बाद प्लास्टिक के धागे से 11 टांके लगा लिए। दिक्कत हुई तो जिला अस्पताल पहुंचे। बिगड़ी हालत देख डॉक्टरों ने भी हाथ खड़े कर दिए और आगरा के रेफर कर दिया… pic.twitter.com/uASSf99iY1
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) March 20, 2025
वृंदावनच्या सुनरख गावातील रहिवासी राजाबाबू असे तरुणाचे नाव आहे, त्याने बीबीएचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो शेती करतो. तो म्हणाला- १८ वर्षापूर्वी माझे अपेंडिक्स ऑपरेशन झाले होते, पण गेल्या काही दिवसांपासून मला पुन्हा पोटात दुखू लागले आहे. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण आराम मिळाला नाही. अल्ट्रासाऊंडसह अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या, पण काहीही निष्पन्न झाले नाही. मंगळवारी रात्री वेदना अधिक तीव्र होऊ लागल्या. यानंतर तरुणाने स्वतःच स्वतःची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.