“हौसेने आणली ती चारचाकी घरी पण मायबाय रस्त्यावरी…” कीर्तनाच्या स्वरूपात तरुणाने गायलं भन्नाट रॅप, Video Viral
महाराष्ट्राला कीर्तनाचा वारसा अनेक शतकांपासून लाभला आहे. लहानपण देगा देवा मुंगीसाखरेचा रवा! बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव! असे अणे मार्मिक श्लोक आपण आजवर ऐकत आलोय. मनाला शांती देण्यासाठी कीर्तनाचा मार्ग कधीधी चांगला. विठ्ठल रखुमाई हे अवघ्या महाराष्ट्राचंचे आराध्य दैवत आहे. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहे. दरवर्षी लाखो भाविक पायी पंढरपूरच्या दिशेने वारीत सामील होतात. टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत, मुखी हरिनामाचा जप करत भक्त अभंग गातात आणि आपला भक्तीमय प्रवास मार्गी लावतात.
आता बदलत्या कालानुसार, तरुणांमध्ये अभंग-कीर्तनाचे महत्तव फार कमी राहिले आहे. अंभग, भजन आणि किर्तन हे आजच्या काळात कुठेतरी हळू हळू मागे पडत चालले आहे. नव्या पिढीला आता रॅप साँग आवडू लागले आहेत. त्यामुळेच आता एका तरुणाने नव्या पिढीची ही आवड जपत संताचे अंभग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी एक नवीन हटके पर्याय निवडला आहे. संताचे अंभग आणि हरिनामाचे रॅप गीत गाऊन काही तरुणांनी नव्या पिढीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर हा भन्नाट व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
वारीची अनेक सुंदर दृश्ये तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये पाहिली असतील. मात्र हातात गिटार, धोतर नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घेऊन , गळ्यात माळ आणि असा हा संपूर्ण वारकऱ्याचा वेश करत रॅप साँग गाताना तुम्ही कधी कोणाला पाहिले आहे का? निश्चितच असे काही तुम्ही पूर्वी पाहिले नसावे मात्र आता या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे. व्हिडिओच्या सुरवातीलाच आपल्याला मृदूंग, गिटार आणि विठ्ठलाची मूर्ती दिसते यानंतर कॅमेरा अँगल बदलतो आणि तीन तरुण रॅप सॉंग सादर करताना दिसू लागतात. त्यांचा पेहराव आणि रॅप यांचा आगळावेगळा मेळ मनाला अचंबित करून जातो.
यात एक तरुण आपल्या मोहक आवाजात संत चोखामेळा यांचा “ऊस डोंगापरी परी रस नव्हे डोंगा”गाताना दिसतो. त्यानंतर दुसरा तरुण रॅप गाताना दिसतो. आपल्या भन्नाट रॅप द्वारे तरुणाने आता नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. या हटके गाण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना तरुणांचा हटके अंदाज फार आवडला आहे.
हेदेखील वाचा – ती भेट ठरली शेवटची! स्कूटरवर बसला अन् … हृदयद्रावक मृत्यूचा Video झालाय Viral
“आळवावरच्या पाण्याला भुलून गेली दुनिया,
खऱ्याला खोटं पण बोलून गेली दुनिया,
‘दिसतं तसं नस’ हे विसरले लोक
चमचमत्या गोष्टीला भारून गेली दुनिया,
लोकांना दाखवायला इमारत बांधली, पण माणसाने माणुसकी वेशीवर टांगली
हौसेने आणली ती चारचाकी घरी,
पण आई-बाप रस्त्यावरी ही गोष्ट ना बरी,
उजडलं तो दिवस येईल यमाची स्वारी,
पाप-पुण्याचा हिशोब होईल देवाच्या दारी
थोडं तत्वानं जग, थोड नीतिने वाग, हरि नाम जप, भर पुण्याचं माप
झिजलं हा देह, झिजलं ती काया,
अरे मृगजळा गतं सार जाई रे वाया
झिजलं हा देह, झिजलं ती काया,
अरे मृगजळा गतं सार जाई रे वाया”
आजच्या तरुणांचा चुकीच्या गोष्टीकडे वाढत कल बघता त्यांना हरिनाम जप करण्यास प्रोत्साहन देणारा हा रॅप नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हायरल व्हिडिओ @rbaposs8055 नावाच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ एकदम कडक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मस्त भारी एक नंबर”.